PHOTO : नागार्जुनसह 'या' दोघांशी होतं अफेयर, अजय देवगणमुळे 53 वर्षीय अभिनेत्री अविवाहित, संपत्तीचा आकडा जाणून व्हाल हैराण

Entertainment : बॉलिवूडची एक दमदार अभिनेत्री आजही केवळ तिच्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर लोकांच्या मनावर राज्य करत नाही तर तिने इंडस्ट्रीत एक वेगळी ओळखही निर्माण केलीय. नागार्जुनसोबत 15 वर्षे नात्यात असूनही वयाच्या 53 वर्षीय ही अभिनेत्री अविवाहित आहे. 

नेहा चौधरी | Nov 04, 2024, 10:49 AM IST
1/8

आपल्या कारकिर्दीत उंचीला स्पर्श करणाऱ्या या अभिनेत्रीला वैयक्तिक आयुष्यात पाहिजे ते कधी मिळालं नाही. माचीस, कालापानी, अस्तित्व, चांदनी बार, मकबूल, चीनी कम, हैदर, दृश्यम, अंधाधुन यातील अभिनेत्री तब्बू. आज 53 व्या वाढदिवस आहे. 

2/8

तब्बूने इंडस्ट्रीत स्वतःची एक खास प्रतिमा निर्माण केली आहे. मात्र, तब्बूच्या अभिनयासोबतच तिचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिलं. तब्बूचं नाव सगळ्या आधी अभिनेता संजय कपूरसोबत जोडलं गेलं होतं. तब्बूने संजयसोबत प्रेम या चित्रपटातून पदार्पण केलं. चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ आले होतं, मात्र चित्रपटाचे शूटिंग संपेपर्यंत त्यांचं नातं तुटलं. 

3/8

यानंतर तब्बूचं नाव फिल्ममेकर साजिद नाडियादवालासोबत जोडलं गेलं. तब्बू साजिदची पहिली पत्नी दिव्या भारतीची चांगली मैत्रीण होती आणि तिच्या मृत्यूनंतर तब्बूने साजिदची काळजी घेतली. यादरम्यान तब्बू आणि साजिद यांच्यात जवळीक वाढली होती, पण साजिद दिव्याला विसरू शकला नाही. अशा परिस्थितीत तब्बूने स्वतःला साजिदपासून वेगळे केलं. 

4/8

यानंतर तब्बू साऊथ स्टार अक्किनेनी नागार्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये आली होती. तब्बू नागार्जुनसोबत 15 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती. जेव्हा तब्बूला कळले की नागार्जुन आपल्या पत्नीला सोडणार नाही, तेव्हा तिने त्याच्यापासून वेगळी होण्याचा निर्णय घेतला. एकेकाळी तब्बू मुंबई सोडून हैदराबादला नागार्जुनसाठी स्थायिक पण झाली होती. असं म्हणतात, नागार्जुननंतर तिने कोणाशीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला. 

5/8

तब्बू आणि अजय देवगण कॉलेज फ्रेंड आहेत. तब्बू एकदा गंमतीत म्हणाली होती की, मी सिंगल आहे तर यामागे अजय देवगण आहे. जर कोणी मुलगा तिच्या जवळ आला तर तो त्याला मारहाण करून पळून जायचा. 

6/8

तब्बू ही हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री असून आज एका चित्रपटासाठी ती 2 ते 4 कोटी रुपये मानधन घेते. अभिनेत्रीची एकूण संपत्ती 22 कोटी रुपयांच्या घरात आहे. अभिनेत्री केवळ चित्रपटातूनच नव्हे तर ब्रँड एंडोर्समेंटमधूनही प्रचंड कमाई करते. 

7/8

एवढंच नाही तर तब्बूकडे तीन आलिशान घरं आहेत. मुंबई, गोवा आणि हैदराबादमध्ये कोट्यवधींचा बंगला आहेत. 

8/8

तब्बूच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर तिच्याकडे अनेक आलिशान कार आहेत. अभिनेत्रीच्या गॅरेजमध्ये Audi Q7, Jaguar X7 यांचा समावेश आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x