कोरोना रुग्णांमध्ये Happy Hypoxia चा धोका, तरुणांच्या मृत्यूमागचं कारण

May 30, 2021, 20:17 PM IST
1/5

दुसऱ्या लाटेत रुग्णालयात अनेक युवकांना दाखल करावं लागलं. कोरोनातून मुक्त झाल्यानंतर ही अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. अनेक युवकांना हॅप्पी हायपोक्सिया (Happy Hypoxia) चा आजाराचा सामना करावा लागत आहे. हॅप्पी हायपोक्सिया COVID-19 रुग्णांसाठी सायलेंट किलर ठरत आहे. युवकांच्या मृत्यूमागे हे देखील कारण असल्याचं बोललं जात आहे.  

2/5

हॅप्पी हायपोक्सिया कोरोना रुग्णांमध्ये लगेच दिसून येत आहे. मेडिकल एक्सपर्टनुसार हॅप्पी हायपोक्सियामुळे रक्तातील ऑक्सीजन कमी होते. रुग्णाला वाटतं की, सगळं काही सामान्य आहे पण ही मृत्यूचं कारण देखील बनू शकते.

3/5

डॉक्टराच्या मते हॅप्पी हायपोक्सिया पीडित रुग्णामध्ये कमी ऑक्सीजन झाल्याने शरीराचे अनेक अंग काम करण्यास बंद करतात. पण रुग्णाला पाहिल्यानंतर असं दिसतं की, तो व्यवस्थित आहे. पण आतून शरीराचं मोठं नुकसान होत असतं.  

4/5

हा आजार कोविड संक्रमित रुग्णांवर अधिक होतो. या रुग्णांमध्ये श्वास घेताना त्रास होत नाही. पण रुग्णांमध्ये ऑक्सीजन लेवल 40 टक्क्यांपर्यंत खाली जातं.

5/5

डॉक्टरांच्या मते, ऑक्सीमीटरने ऑक्सीजनची लेवल तपासली पाहिजे. श्वास घेताना त्रास होत नसला असला ताप, सर्दी किंवा घश्यात खवखवत असेल तर सावध होण्याची गरज आहे. या रुग्णांमध्ये स्कीनचा रंग देखील बदलतो. कोणतंही अवघड काम करत नसताना ही खूप घाम येतो.