करोडोंच्या कार्स, पेंटहाऊस आणि अलिशान घर; हार्दिक पांड्याची संपत्ती किती?

| May 25, 2024, 18:15 PM IST
1/13

करोडोंच्या कार्स, पेंटहाऊस आणि अलिशान घर; हार्दिक पांड्याकडे किती संपत्ती ?

Hardik Pandya Divorce know Networth Wife Natasa Relationship Marathi News

Hardik Pandya Networth: मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या गेल्या काही दिवसांपासून वाईट काळातून चाललाय. आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने पांड्याला 50 कोटी रुपयांमध्ये फी देऊन घेतले. पण त्याच्याकडून पाहिजे तशी कामगिरी झाली नाही.  

2/13

यंदाचे आयपीएल काही चांगले गेले नाही.

Hardik Pandya Divorce know Networth Wife Natasa Relationship Marathi News

दुसरीकडे रोहित शर्माला कॅप्टन्सीवरुन पायउतार केल्यानंतर रोहितच्या फॅन्सनी यासाठी हार्दिक पांड्याला जबाबदार धरले. स्टेडियममधून त्याला चांगलेच ट्रोल करण्यात आले. यामुळे पांड्याचे यंदाचे आयपीएल काही चांगले गेले नाही.

3/13

अमेरिकेला रवाना होणार

Hardik Pandya Divorce know Networth Wife Natasa Relationship Marathi News

हार्दिक पांड्या संघातील अनेक खेळाडूंसह टी-20 विश्वचषकासाठी अमेरिकेला रवाना होणार आहे. मात्र त्याआधी हार्दिक पांड्याबाबत आणखी एक बातमी समोर आली आहे. 

4/13

घटस्फोट घेणार असल्याची चर्चा

Hardik Pandya Divorce know Networth Wife Natasa Relationship Marathi News

हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियात होतेय. हार्दिकपासून विभक्त झाल्यानंतर त्याची पत्नी क्रिकेटरच्या संपत्तीतील 70 टक्के हिस्सा घेणार असल्याचे बोलले जाते. मात्र याबाबत दोन्ही बाजूंकडून कोणती अधिकृत माहिती देण्यात आली नाही.  

5/13

किती मालमत्ता?

Hardik Pandya Divorce know Networth Wife Natasa Relationship Marathi News

असे असताना हार्दिक पांड्याकडे किती मालमत्ता आहे? क्रिकेट व्यतिरिक्त पांड्या कोणत्या माध्यमातून कमाई करतो? नताशाला 70 टक्के रक्कम द्यावी लागली तर त्याच्याकडे किती रक्कम शिल्लक राहते? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. 

6/13

कुठून मिळतो पैसा?

Hardik Pandya Divorce know Networth Wife Natasa Relationship Marathi News

हार्दिकला त्याचा सर्वाधिक पैसा क्रिकेट खेळून आणि जाहिरातीतून मिळतो. हार्दिक पांड्याला आयपीएलमधून 15 कोटी रुपये फी मिळते.   

7/13

दरवर्षी 5 कोटी रुपये

Hardik Pandya Divorce know Networth Wife Natasa Relationship Marathi News

याशिवाय हार्दिक पांड्या हा बीसीसीआयच्या केंद्रीय करारात ए ग्रेडमध्ये असून त्याला बोर्डाकडून दरवर्षी 5 कोटी रुपये मिळतात. ही रक्कम मॅच फी व्यतिरिक्त असते.

8/13

जाहीरात करुन कमाई

Hardik Pandya Divorce know Networth Wife Natasa Relationship Marathi News

याशिवाय हार्दिक मॉन्स्टर एनर्जी, द सोलेड स्टोअर, ड्रीम 11, हाला प्ले, गल्फ ऑइल, जिलेट, व्हिलेन लाइफ परफ्यूम्स, झगाल, सिन डेनिम, बोट, ओप्पो आणि रिलायन्स रिटेल सारख्या ब्रँडची जाहीरात करुन कमाई करतो. 

9/13

जाहिरातीही मिळायला सुरुवात

Hardik Pandya Divorce know Networth Wife Natasa Relationship Marathi News

हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सचे दोन सिझनमध्ये नेतृत्व केले असून त्याच्या नेतृत्वाखाली संघाने पहिल्याच सत्रात विजेतेपद पटकावले होते. यानंतर त्याला जाहिरातीही मिळायला सुरुवात झाली. 

10/13

हार्दिककडे 5 कोटींचे घर, पेंटहाऊस

Hardik Pandya Divorce know Networth Wife Natasa Relationship Marathi News

हार्दिककडे एक पेंटहाऊस आहे. ज्याची किंमत 3.6 कोटींपेक्षा जास्त आहे. वडोदा येथील वाघोडिया रोडवर असलेले त्यांचे घर खूपच आलिशान आहे. 

11/13

पांड्याचे नेटवर्थ

Hardik Pandya Divorce know Networth Wife Natasa Relationship Marathi News

स्पोर्ट्सकीडाने दिलेल्या माहितीनुसार हार्दिक पांड्या सुमारे 11 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 91 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. 

12/13

पांड्या बंधूंचे घर

Hardik Pandya Divorce know Networth Wife Natasa Relationship Marathi News

याशिवाय पांड्या बंधूंचे मुंबईतील वर्सोवा भागात 2BHK अपार्टमेंट आहे. याशिवाय काही मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, हार्दिक पांड्याने मुंबईत 30 कोटी रुपयांचा अपार्टमेंट घेतला आहे.

13/13

कोटींच्या गाड्या

Hardik Pandya Divorce know Networth Wife Natasa Relationship Marathi News

हार्दिक पांड्याकडेही वाहनांचा संग्रह आहे. 29 वर्षीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याकडे ऑडी ए6, लंबॉर्गिनी हर्कन ईव्हीओ आणि मर्सिडीज जी वॅगन सारख्या करोडो रुपये किंमतीच्या कार आहेत.