न्यूझीलंडच्या रस्त्यावर रिक्षातून फिरला हार्दिक; विलियम्सनसोबत फोटोशूट

टी-20 वर्ल्ड कप 2022 नंतर टीम इंडिया न्यूझीलंडच्या दौऱ्यावर पोहोचली आहे. या ठिकाणी हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला 3 टी-20 सामने तर शिखर धवनच्या नेतृत्वाखाली 3 वनडे सामने खेळायचे आहेत. टी-20 सिरीजचा पहिला सामना 18 नोव्हेंबर म्हणजेच शुक्रवारी होणार आहे. वेलिंगटनमध्ये हा सामना होणार असून या पूर्वी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन आणि हार्दिक पंड्या यांनी फोटोशूट केलंय.

Nov 16, 2022, 23:02 PM IST
1/4

फोटो शूट करताना ट्रॉफीसोबत केन आणि हार्दिक पोझ देऊन उभे होत. तितक्यातच एक हवेचा झोका आणि हवेने ट्रॉफी पडत होती. मात्र यावेळी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनच्या तत्परतेमुळे ट्रॉफचं नुकसान झालं नाही. कारण केनने लगेच ही ट्रॉफी कॅच केली.

2/4

हार्दिक पंड्या आणि केन विलियम्सन या दोघांनीही ही रिक्षा चालवत आनंद लुटला. त्यानंतर दोघंही टी-20 सिरीजच्या ट्रॉफीपाशी पोचले. यावेळी त्यांनी स्डेडियमजवळ पोहोचले आणि मजा मस्ती करत फोटो काढले.

3/4

हे फोटोशूट दोघांसाठी फार खास ठरलं. दोन्ही कर्णधारांनी यावेळी एका स्पेशल रिक्शामधून प्रवासही केला. क्रोकोडाइल ऑटो असं याचा स्पेशल नाव आहे.

4/4

टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि केन विलियम्सन यांनी वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमजवळ फोटोशून केलं. 18 नोव्हेंबरपासून टी-20 सिरीजला सुरुवात होणार आहे.