Royal Enfield चं आता काय होणार? तुम्हीही ही बाईक वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

Royal Enfield बाईक्सचा एक मोठा चाहतावर्ग आहे. ऑफरोडिंगसाठी अनेकजण याच बाईकला पसंती देतात. काहीकांसाठी तर ही ड्रीम बाईक... पण आता...   

Mar 07, 2023, 11:35 AM IST

350cc Motorcycle: Royal Enfield या ब्रँडच्या नावातच रॉयलपणा आहे नाही का? हेवी मेटल बॉडी आणि दमदार इंजिनसह कमाल पिकअप देणारी ही बाईक अनेक वर्षांपासून कित्येक रायडर्सना आनंद देत आली आहे. पण, आता मात्र या बाईकवरून काहींची नजर हटू शकते. 

1/7

royal enfield

Harley Davidson bikes to lauch 350 CC motorcycle read details watch photo

कारण? कारण आहे Harley Davidson ची नवी बाईक. ज्यामुळं आता एनफिल्डचं काय होणार हाच प्रश्न अनेकांना पडत आहे.   

2/7

enfield

Harley Davidson bikes to lauch 350 CC motorcycle read details watch photo

350 सीसीच्या बाईक जगतात दबदबा असणाऱ्या एनफिल्डला आता हार्ले डेविडसन टक्कर देणार आहे. कारण त्यांची नवी बाईक लवकरत लाँच करण्यात येणार आहे

3/7

Harley Davidson news

Harley Davidson bikes to lauch 350 CC motorcycle read details watch photo

शिवाय X350 मध्ये शार्प फ्यूल टँक आणि स्टेप अप सीटही देण्यात येईल.   

4/7

Harley Davidson price

Harley Davidson bikes to lauch 350 CC motorcycle read details watch photo

ही बाईक हार्ले-डेविडसन X350 आणि X500 अशा रेट्रो थीममध्ये असेल. ज्यामध्ये राऊंड हेडलँप, रियर व्ह्यू मिरर आणि सर्क्युलर इंस्ट्रूमेंट पॉड दिलेले असतील. 

5/7

Harley Davidson bike

Harley Davidson bikes to lauch 350 CC motorcycle read details watch photo

Harley-Davidson X350 मध्ये 353cc इंजिन असेल. जे  35-36 पीएस इतकी पॉवर देईल. या बाईकचं वजन असेल 195 किलो. तर तिचा टॉप स्पीड असेल 89 मैल प्रती तास, म्हणजेच साधारण 143 किमी प्रती तास. 

6/7

Harley Davidson 350 cc

Harley Davidson bikes to lauch 350 CC motorcycle read details watch photo

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या बाईक्सचा बोलबाला असला तरीही भारतात मात्र ती केव्हा लाँच होईल याबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.   

7/7

Harley Davidson

Harley Davidson bikes to lauch 350 CC motorcycle read details watch photo

इथं विक्रीसाठी हार्ले डेविडसननं हिरो मोटोकॉर्पसह भागिदारी केल्यामुळं आता पुढचे निर्णय घेतले जात आहेत. ज्यामुळं आता एनफिल्ड पाहिल्यावर काळजाचा ठोका चुकणाऱ्यांच्या नजरा या बाईककडे वळतात का हे पाहणंही औत्सुक्याचं असेल.