Harley Davidson X440 भारतात लाँच; रॉयल एनफिल्डला देतेय टक्कर; किंमतही त्याहून कमी

Harley Davidson X440 : हार्ले डेव्हिडसन घ्यायची म्हणजे पहिला प्रश्न उभा राहतो तो म्हणजे आर्थिक जुळवाजुळवीचा. आता मात्र हा प्रश्नही सुटेल. कारण, या बाईकची किंमतही तुम्हाला परवडणार आहे. 

Jul 04, 2023, 12:41 PM IST

Harley Davidson X440 : क्रूझर बाईक्समध्ये अनेकांच्याच आवडीचे ब्रँड्स ठरलेले असतात. कोणाला जावा आवडते, तर काही बाईकप्रेमी Royal Enfield शीच प्रामाणिक राहतात. हार्ले डेव्हिडसन या बाईकवर जीव असणारेही कमी नाहीत. 

1/7

Harley Davidson X440

Harley Davidson X440 launched in india know features price

भारतात Harley Davidson X440 नुकतीच लाँच करण्यात आली आहे. ही बाईक तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. डेनिम, विविड आणि एस असे हार्ले डेव्हिडसन X440 चे तीन व्हर्जन. 

2/7

बाईकची किंमत

Harley Davidson X440 launched in india know features price

किमतीचं सांगावं तर, एनफिल्डचं टॉप मॉडेल असणाऱ्या सुपर मिटीटॉर बाईकपेक्षाची या बाईकची किंमत कमी आहे. 

3/7

खरेदी करा हार्ले डेव्हिडसन

Harley Davidson X440 launched in india know features price

जिथं सुपर मिटीयॉर साडेतीन लाखांच्या घरात जाते, तिथंच हार्ले डेव्हिडसनची बाईक तुम्ही 2.29 लाख, 2.49 लाख आणि 2.69 लाख रुपयांना खरेदी करु शकता. 

4/7

हिरो- हार्ले

Harley Davidson X440 launched in india know features price

ही बाईक हिरो- हार्ले या दोन्ही कंपन्यांनी मिळून तयार केलेली पहिलीच बाईक असून, तिची निर्मिती हिरोच्या राजस्थानमधील प्लांटवर होणार आहे. राऊंड हेडलाईट, न्यूट्रल सेट फूट पेग, वाईड बार अशी ही बाईक एका क्लासिक लूकमध्ये तुमच्यासमोर येते. 

5/7

बाईकचे फिचर्स

Harley Davidson X440 launched in india know features price

युएस फोर्क्स, ड्युएल चॅनल एबीएस असणारे डिक्स ब्रेक, टीएफटी डॅश, 18 इंचांचा फ्रंट आणि 17 इंचांचा रिअर व्हील असे अफलातून फिचर्स या बाईकला आणखी उठावदार करतात.   

6/7

इंजिन आणि पॉवर

Harley Davidson X440 launched in india know features price

हार्ले- हिरोच्या या बाईकला 440 सीसी, ऑईस कूल्ड सिंगल सिलिंडर इंजिन आहे. ज्यातून 27 बीएचपी आणि 38 एनएम टॉर्क जनरेट होतो.  

7/7

बाईकच्या मार्केटचं सांगावं तर, ही बाईक एनफिल्डची 350, होंडा सीबी 350, सीबी 350 आरएस या आणि अशा इतर बाईकना टक्कर देईल.