Best Tourist Places in India: भारतातील 'ही' सुंदर ठिकाणे तुम्ही पाहिली आहेत का? नसेल तर एकदा भेट द्या !

Indian Beautiful Tourist Places : उन्हाळ्याची शाळांना सुट्टी पडलेली आहे. मुलांना घेऊन तुम्ही तुम्ही फिरण्याचा बेत करत असला तर भारतीय ही प्रेक्षणीय स्थळे तुम्ही पाहू शकता. जगभरातील लोक या ठिकाणांना आवर्जुन भेट देत असतात. कारण येथील हवामान खास आहे. जर तुम्ही भारतात रहात असाल तर इथे तुम्हाला पहाड, समुद्र, जंगल आणि हिल स्टेशन सारे पर्याय पाहायला मिळतील. बस तुम्ही तुमची बॅग पॅक करा आणि फिरण्यासाठी आणि मौजमज्जा करण्यासाठी बाहेर पडा. ही आहेत भारतातील सुंदर ठिकाणे.

| May 11, 2023, 17:48 PM IST
1/5

Ladakh Places : उन्हाळ्याच्या उकाड्याने हैराण झाला असाल तर उन्हाळ्याच्या दृष्टीने लडाख हे भारतातील सुट्ट्यांसाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. लडाख हे प्रत्येक दुचाकीस्वाराचे स्वप्नातील ठिकाण आहे. लडाखच्या टेकड्या आणि तलाव हे आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहेत. पन्ना पँगॉन्ग त्सो सरोवराला भेट देऊन तुम्ही आनंद लुटू शकता.  

2/5

Shimla Places : शिमल्यापासून जाखू हिल हे एक लहान आणि सुंदर ठिकाण आहे. येथे तुम्ही हनुमानाचे दर्शन घेऊ शकता. शिमलाचा ​​मॉल रोड पर्यटकांना सर्वाधिक आकर्षित करतो. येथील व्हाइसरेगल लॉज देशभरात खूप प्रसिद्ध आहे. या शहराच्या स्थापनेचे श्रेय ब्रिटिशांना जाते.

3/5

Mount Abu Places :  माउंट अबू हे आकर्षणाचे केंद्र आहे. जिथे तुम्ही निवांत क्षण घालवू शकता आणि या तलावातील बोट राईड तुम्ही कधीही विसरणार नाही. येथील सूर्यास्ताचे दृश्य पाहण्यासारखे आहे. याशिवाय माउंट अबूचे दिलवाडा मंदिर जगभर प्रसिद्ध आहे.

4/5

Kashmir Places : पृथ्वीवर सुंदर ठिकाण हे काश्मीर आहे. काश्मीरमध्ये अनेक वेळा बर्फ पडते. येथील हवामान खूप चांगले आहे. तुम्ही विचार येथे जाऊ शकता. तलाव, हाउसबोट, टेकड्या आणि बर्फाचे डोंगर पाहू शकता. येथे तुम्ही दल सरोवराच्या पाण्यात क्रूझ आणि गुलमर्गमधील गोंडोला राइडचा आनंद लुटता येईल. इतकेच नाही तर बॉलिवूड चित्रपटांसाठीही काश्मीर सर्वोत्तम लोकेशन ठरत आहे. याठिकाणी शुटिंगही होते.

5/5

Manali Places  : भारतातील मनाली हे एक सुंदर ठिकाण आहे. उन्हाळ्यात भेट देण्यासाठी मनाली हे भारतातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. येथे तुम्ही पॅराग्लायडिंग, झोर्बिंग आणि क्वाड बाइकिंग सारखे अनेक साहसी खेळ करु शकता. जर तुम्हाला बर्फात खेळाचे असेल तर येथे जाऊ शकता. येथे जवळच पक्षी अभयारण्यही आहे.