एवढा मोठा भोपळा...; ज्या भाजीसाठी नाकं मुरडता त्याचे फायदे पाहून आजच खायला सुरुवात कराल

Health benefits of Pumpkin : एकदा पाहूनच घ्या, कारण हे फायदे वाचून तुम्ही बाजारात थेट भोपळा आणण्यासाठीच धाव माराल.   

Jan 25, 2023, 14:50 PM IST

Health benefits of Pumpkin : एवढा मोठ्ठा भोपळा... आकाराने वाटोळा... ही अशी बालगीतं आपण सर्वांनीच बालपणापासून म्हटलीयेत. पण, हा भोपळा जेव्हा जेवणात वाढला जातो तेव्हा मात्र नाकं मुरडली जातात. तुम्हीआम्ही अनेकांनीच असं किमान एकदातरी केलंच असेल. पण, या भोपळ्याचे फायदे किती आहेत तुम्हाला माहितीय का? 

1/5

Pumpkin as anti aging substance

health benefits and importance of Pumpkin know more

भोपळ्यामध्ये Vitamin E मोठ्या प्रमाणात असतं. वाढत्या वयाची चिन्हं दिसू न देण्यासाठी अनेकजण भोपळा खातात. त्वचेच्या सौंदर्यासाठीसुद्धा भोपळ्यापासून तयार करण्यात आलेले पदार्थ खाण्याला अनेकजण प्राधान्य देतात. युव्ही रेडिएशन आणि प्रदूषणापासून भोपळा त्वचेचं संरक्षण करतो. 

2/5

Pumpkin for immunity

health benefits and importance of Pumpkin know more

भोपळ्यामध्ये असणाऱ्या 'विटामिन सी'मुळं शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. विविध प्रकारचे संसर्ग आजारपण दूर ठेवण्यासाठी हा घटक फायदेशीर ठरतो. 

3/5

Pumpkin for blood pressure

health benefits and importance of Pumpkin know more

भोपळ्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण सर्वाधिक असतं. यामुळं रक्तदाब नियंत्रणात राहतो. थोडक्यात हृदयविकाराचा धोका कमी होतो. 

4/5

Pumpkin for weight loss

health benefits and importance of Pumpkin know more

भोपळ्यामध्ये कॅलरीचं प्रमाण अतिशय कमी असतं, तर यामध्ये असणारे तंतुमय घटक वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. 

5/5

Pumpkin for eyesight

health benefits and importance of Pumpkin know more

डोळ्यांचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठीसुद्धा भोपळा खाणं फायद्याचं ठरतं. यामध्ये असणारा विटामीन A हा घटक इथं तुमची मदत करतो. वयोमानानुसार होणारे डोळ्यांचे विकार यामुळं दूर राहतात.