सकाळी दात घासायच्या आधी पाणी पिण्याचे शरीरावर काय होतात परिणाम? शरीराला फायदे होतात की तोटे? जाणून घ्या

आपण सर्वांनी पाणी प्यायलाच हवं. पाणी पिणं आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं ( Habit of drinking water Drinking water) आहे. पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत हे आपल्याला ठाऊक आहेच. रिकाम्यापोटी पाणी पिण्याने आपल्या शरीरातील विषारी ( Flushing toxins from body) पदार्थ शरीराबाहेर फेकले जातात. आपलं शरीर हायड्रेटेड राहतं. पाणी पिण्याने पोट आणि त्वचेसंदर्भातील ( Helpful for stomach) त्रासापासून बचाव होतो. डॉक्टरही आपल्याला दिवसात दोन ते तीन लिटर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पाणी पिणं चांगलं आहे हे आपल्याला माहित असलं तरीही ते नेमकं कधी प्यावं याबाबत नीट माहिती नाही.

Nov 24, 2022, 20:11 PM IST

Effec of drinking water before brushing teeths : आपण सर्वांनी पाणी प्यायलाच हवं. पाणी पिणं आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं ( Habit of drinking water Drinking water) आहे. पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत हे आपल्याला ठाऊक आहेच. रिकाम्यापोटी पाणी पिण्याने आपल्या शरीरातील विषारी ( Flushing toxins from body) पदार्थ शरीराबाहेर फेकले जातात. आपलं शरीर हायड्रेटेड राहतं. पाणी पिण्याने पोट आणि त्वचेसंदर्भातील ( Helpful for stomach) त्रासापासून बचाव होतो. डॉक्टरही आपल्याला दिवसात दोन ते तीन लिटर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पाणी पिणं चांगलं आहे हे आपल्याला माहित असलं तरीही ते नेमकं कधी प्यावं याबाबत नीट माहिती नाही. सकाळी दात घासायच्या आधी पाणी पिणं शरीरासाठी योग्य ठरतं की अयोग्य? याचे आरोग्यासाठी फायदे आहेत की तोटे? जाणून घेऊया. 

1/5

अनेकांचं म्हणणं आहे की सकाळी दात घासायच्या आधी पाणी पिण्याने पचन क्षमता मजबूत होते. यासोबतच तोंडात बॅक्टेरिया साचून राहत नाहीत. 

2/5

सकाळी विना दात घासता पाणी पिण्याने तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक ( Boost Immunity)  क्षमता अधीक मजबूत होते. ज्यांना पटकन सर्दी होते यांनी सकाळी अशा पद्धतीने पाणी पिणं फायद्याचं ठरतं. 

3/5

सकाळी बिना ब्रश करता पाणी पिण्याने तुमचे केस अधिक चमकदार आणि मजबूत होतात. सोबतच तुमची त्वचा अधिक नितळ होण्यास मदत होते. यासोबतच पोटाशी निगडित बद्धकोष्टासारखे आजार दूर होतात. 

4/5

ब्रश करण्याआधी पाणी पिण्याने तोंडातील अल्सर देखील दूर होतो. याने आंबट ढेकरही येत नाहीत. 

5/5

जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा (High Blood pressure) असेल किंवा तुम्हाला मधुमेह (Diabetes) असेल तरीही तुम्ही सकाळी ब्रश न करता पाणी प्यायला हवं. सकाळी बिना ब्रश करता रिकाम्यापोटी पाणी पिण्याने जाड्यत्व (Obesity) देखील कमी होतं  (डिस्क्लेमर - वरील दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन जीवनात याचा वापर करायचा झाल्यास डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)