'या' 7 सवयींमुळे पावसाळ्यात आजारपण होईल दूर

पाऊस म्हटला की भिजण्याचा मोह हा प्रत्येकाला होतो. मात्र याच पावसाची दुसरी बाजू मात्र आजारपणाला आमंत्रण देणारी ठरते. बऱ्याच जाणांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते.त्यामुळे वातावरण बदलल्यावर ताप, खोकला आणि सर्दीसारखे आजार बळावतात. 

Jun 22, 2024, 15:43 PM IST

पाऊस म्हटला की भिजण्याचा मोह हा प्रत्येकाला होतो. मात्र याच पावसाची दुसरी बाजू मात्र आजारपणाला आमंत्रण देणारी ठरते. बऱ्याच जाणांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते.त्यामुळे वातावरण बदलल्यावर ताप, खोकला आणि सर्दीसारखे आजार बळावतात. 

1/7

व्हिटामीन सी

पावसाळ्यात सूर्यप्रकाश जास्त मिळत नसल्याने जीव-जंतू मोठ्या प्रमाणात वाढतात. त्यामुळे साथीचे आजार झपाट्याने पसरतात. म्हणूनच 'व्हिटामीन सी'चा आहारात समावेश नक्की करा. सकाळी उठल्यावर 'लिंबू पाणी' प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्याने अनेक आजार दूर होतात.   

2/7

भरपूर पाणी पिणं

पावसाळ्यात वातावरण थंड असल्याने फार तहान लागत नाही. त्यामुळे पावसाळ्यात देखील डिहायड्रेशनचा त्रास जास्त जाणवतो. म्हणूनच  शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पावसाळ्यात उकळेलं पाणी प्यावं. 

3/7

आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा

पावसाळ्यात घाणीचं साम्राज्य वाढलेलं असतं, त्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया पसरवणाऱ्या डासांची पैदास वाढते. त्यामुळे आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि कोरडा ठेवणं आवश्यक आहे. म्हणूनच झाडांच्या कुंडीत साचलेलं पाणी फेकून द्यावं.   

4/7

कापूर आणि धूप

कापूर आणि धूप हे जंतूनाशक आहे. संध्याकाळच्या वेळी धूप आणि कापूर जाळल्याने घरातील हवा स्वच्छ होते. त्याशिवाय कापूर आणि धूपाच्या वासाने डास,रातकिडे आणि माश्या घरात येत नाही.   

5/7

स्वच्छ अंघोळ करणं

बाहेरुन घरी आल्यावर फक्त हात पाय न धुता गरम पाण्याने स्वच्छ अंघोळ करावी. अंघोळीच्या पाण्यात कापूर तेल किंवा निलगिरी तेलाचे काही थेंब टाकून अंघोळ करावी. त्याचबरोबर गरम पाण्यात खडा मीठ टाकून अंघोळ केल्याने त्वचा विकार दूर होतात. 

6/7

बाहेरचं खाणं टाळा

पावसाळ्यात रोगराईचं साम्राज्य पसरलेलं असंत त्यामुळे बऱ्याचदा अन्नातून विषबाधा होण्याचं प्रमाण ही जास्त असतं. खराब पाणी आणि जीवजंतूंमुळे अन्नपदार्थ खराब होतात. त्यामुळे पावसाळ्यात कॉलरा, टायफाईड आणि कावीळचं होण्याचं प्रमाण जास्त असतं. 

7/7

ताज्या पदार्थांचं सेवन

पावसाळ्यात अन्नपदार्थ लवकर खराब होतात, म्हणून घरचं ताजं अन्न खाणं आरोग्यदायी असल्याचं डॉक्टर कायमच सांगतात. स्वयंपाक करण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुवावेत. याशिवाय वाढलेल्या नखात घाण साचून राहते, म्हणून वेळच्या वेळी नखं कापावीत.