अंतराळातून थेट हॉस्पीटलमध्ये; पृथ्वीवर परतलेले अंतराळवीर स्वत:च्या पायावर का चालू शकत नाहीत?

NASA च्या मानवी अंतराळ मोहिमने यशस्वी टप्पा गाठला आहे. चार आंतराळवीर पृथ्वीवर परतले आहेत. 

Sep 05, 2023, 23:13 PM IST

International Space Station SpaceX Crew-6 : अमेरिकन अंतराळ संस्था म्हणजेच नासाच्या International Space Station वर कार्यरत असलेले चार अंतराळवीर पृथ्वीवर सुखरुप परतले आहेत. अंतराळात जाणाऱ्या अंतराळवीरांना अनेक शारिरीक समस्या निर्माण होतात. यामुळे कित्येत दिवस  अंतराळवीर स्वत:च्या पायावर चालू शकत नाहीत.

1/8

नासाचे चार अंतराळवीर (Astronaut) सहा महिन्यांच्या यशस्वी अंतराळ मोहिमेनंतर सोमवारी पृथ्वीवर (Earth) परतले आहेत. 

2/8

एका विशिष्ट वातावरणात राहिल्यामुळ त्यांच्या मानसिक स्वस्थावर देखील याचा परिणाम होते. एकूणच शारिरीक मानसिकरीत्या पुन्हा सक्षम करण्यासाठी अंतराळवीरांवर रुग्णालयात उपचार केले जातात.        

3/8

पृथ्वीवर परत आल्यावर अंतराळवीर नीट उभ देखील राहू शकत नाहीत. उभ राहिल्यावर त्यांचा तोल जातो. कित्येत दिलस ते चालू शकत नाहीत.

4/8

अंतराळात अंतराळवीर हवेत तरंगत असतता यामुळे ते चालत नाहीत. परिणामी त्यांच्या स्नायूंची शक्तीही कमी होते.   

5/8

अंतराळात वजन जाणवत नाही. पण पृथ्वीवर परत आल्यानंतर, यामुळं या अंतराळवीरांना अशक्तपणा आणि थकवा जाणवतो.

6/8

पृथ्वीवर परतलेल्या चारही अंतराळवीरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर विविध उपचार सुरु आहेत.   

7/8

स्टीफन बोवेन आणि वॉरेन ‘वुडी' होबर्ग, रशियाचे आंद्रेई फेदयेव आणि संयुक्त अरब अमिरात (UAE) चे सुल्तान अल-नेयादी हे चार अंतराळवीरांनी यशस्वी अंतराळ मोहिमेनंतर पृथ्वीवर लँडिंग केले आहे.

8/8

स्पेसएक्स कॅप्सूलच्या (SpaceX Capsule) मदतीने फ्लोरिडाच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर अटलांटिक समुद्रामध्ये पॅराशूटच्या साहाय्यान या अंतराळवीरांना पृथ्वीवर उतरवण्यात आले.