जिभेवरील 'हे' रंग ठरू शकतात गंभीर आजाराचे लक्षण, आताच जाणून घ्या..

Tongue Health: तुम्ही आजारी पडल्यावर जेव्हा डॉक्टरकडे जाता तेव्हा डॉक्टर तुम्हाला 'जीभ दाखव' असे सांगतात. त्यानंतर टॉर्चने तुमची जीभ पाहतात आणि तुम्हाला काय त्रास होतो आहे याची चौकशी करतात.

Mar 13, 2023, 12:18 PM IST

डॉक्टर कधी कधी नुसते जिभेकडे बघून काय प्रॉब्लेम आहे हे डॉक्टरांना कळते. पण असे कसे होते? जिभेवरुन शरीरात काय बिघडले आहे हे कळते. डॉक्टरांना तुम्हाला तुमची जीभ पिवळी, पांढरी किंवा गुलाबी दिसली तर ते लगेचच तुम्हाला काय झालंय हे डॉक्टर सांगू शकतात

1/6

tongue

पोटात अन्न वाहून नेण्यासाठी जीभ हा महत्त्वाचा अवयव आहे. हीच जीभ तुम्हाला आरोग्याविषयीसुद्धा माहिती देऊ शकते. रुग्णाला कोणता आजार झाला आहे हे डॉक्टर फक्त जिभेकडे पाहूनच सांगू शकतात. जर जिभेत फरक असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरात काही समस्या आहेत

2/6

pink tongue

गुलाबी रंगीत जीभ म्हणजे तुमची तब्येत पूर्णपणे ठीक आहे. जर जीभ हलकी गुलाबी असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे. 

3/6

red tongue

जीभ खूप लाल, खडबडीत वाटू लागली आणि जर अन्न खूप मसालेदार वाटू लागले तर याचा अर्थ तुमच्या शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता आहे.

4/6

white tongue

जिभेवर पांढरा थर जमला असेल किंवा जीभ जाड झाली असेल, तर ते बहुतेक पोटाच्या संसर्गामुळे होते. यामध्ये रुग्णाला गॅस्ट्रो, कोलायटिस किंवा टायफॉइड सारखा आजार झाला असण्याची शक्यता असते.

5/6

black tongue

कधीकधी जीभ काळी किंवा जांभळी दिसते तेव्हा शरीरातील संसर्गामुळे किंवा रासायनिक ओव्हरडोजमुळे असे होऊ शकते. 

6/6

yellow tongue

तर पिवळी जीभ बहुतेक मधुमेही रुग्णांमध्ये किंवा कावीळ झालेल्या लोकांमध्ये दिसून येते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 Tass याची पुष्टी करत नाही.)