Health Tips : उन्हाळ्यात आंबे खाताय? पण त्यानंतर चुकूनही खाऊन नका हे पदार्थ... आरोग्यास धोकादायक

Health Tips : उन्हाळा आला की प्रत्येकला आठवण येते ती सोनेरी पिवळ्या रसरशीत हापूस आंब्याची (Mango). त्याचा तो सुगंध आणि चव मनाला मोहून टाकते. कितीही महागडा असला तरी आंब्याची चव चाखण्यासाठी प्रत्येक घरात हापूस दिसतोच. आंबा चवीला गोड तर आहेच पण हे फळ आरोग्यासाठीही (Health) फायदेशीर मानला जातं. आंबा अनेक पोषक तत्वांनी (nutrients) समृद्ध आहे. यामध्ये फायबर, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे यांसारखे पोषक घटक असतात. तसंच 'ए', 'बी' आणि 'सी' व्हिटॅमिनची भरपूर मात्रा असते. पण आंबो खाल्यानंतर थोडीशी काळजी घेणंही गरजेचं आहे. 

May 17, 2023, 21:17 PM IST
1/6

आंबा खाताना ही काळजी घ्या

आंब्याला फळांचा राजा म्हटलं जातं. लहान-थोर प्रत्येकाला आंबा हे फळ प्रचंड आवडतं. त्यामुळे एकदा का आंबे घरी आले की आपण भरपेट खातो. आंबा आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी आंबा खाताना थोडीशी काळजीही घेण्याची गरज आहे. आंबा खाल्यानंतर काही पदार्थ खाल्यास तुमच्या आरोग्यावर तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. 

2/6

कारलं

आंबा खाल्यानंतर काही पदार्थ खाणं टाळा. या यादीत पहिल्या स्थानावर आहे ती कार्ल्याची भाजी. आंबा खाल्यानंतर कारलं चुकूनही खाऊ नका. आंबा हा गोड तर कारलं हे कडू असतं. गोड पदार्थावर कडू पदार्थ खाल्याने त्याचे उलट परिणाम होऊ शकता. मळमळ, उलटी किंवा श्वसनाचा त्रास होऊ शकतो. 

3/6

मिर्ची

आंबा खाल्यानंतर मिर्चीचे पदार्थ खाणं टाळा. आंब्यावर मिर्चीचं सेवन केल्यास पोटाचे विकार उद्भवू शकतात. पोटात जळजळ जाणू शकते. तसंच उलटीचा त्राही होऊ शकतो. 

4/6

दही

सर्वात महत्त्वाचं म्हणजे आंबा खाल्यानंतर कधीही दह्याचं सेवन करु नका. चुकून असं केल्यास घास, डोकं दुखू शकतं, तसंच खोकला आणि सर्दी होण्याची शक्यताही बळावते. काही वेळा हगवणीचा त्रासही होऊ शकतो. 

5/6

कोल्ड ड्रिंक

आंबा खाल्ल्यानंतर लगेच कोल्ड ड्रिंक पिल्याने शरीरावर त्याचे परिणाम होऊ शकतात. आंब्यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असतं आणि कोल्ड ड्रिंकमध्ये देखील साखरेचं प्रमाण जास्त असतं. आंबा खाल्ल्यानंतर कोल्ड ड्रिंक प्यायल्यास मधुमेह होण्याचा धोका उद्भवू शकतो.

6/6

पाणी

अनेकांना आंबा खाल्यानंतर पाणी पिण्याची सवय असते. पण ही सवय तुमच्या आरोग्यास धोकादायक ठरू शकते. आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्याने पोटदुखी, गॅसची समस्या उद्भवते. आंबा खाल्ल्यानंतर किमान अर्ध्या तासाने पाणी प्यावे.