Health Tips: रोज एकसारखंच जेवणं आरोग्यासाठी हानीकारक, जाणून घ्या धोके

Health Tips: तुमच्या जेवणात जर रोज तेच तेच पदार्थ असतील तर हा काळजीचा विषय आहे. जर तुम्ही सर्व प्रकारच्या अन्नाचं सेवन करत नसाल तर तुम्हाला आरोग्याच्या अनेक समस्या जाणवू शकतात. तुम्ही कुपोषित होण्याची भीतीही असते.   

Feb 28, 2023, 21:26 PM IST
1/5

Health Tips: उत्तम आरोग्य हवं असेल तर रोज व्यायाम कऱण्यासाह आपल्या पोटात काय जातंय याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. याच कारणामुळे काही जण रोज एकाच प्रकारचं अन्न सेवन करतात. पण जर तुम्हालाही अशी सवय असेल तर तात्काळ थांबवण्याची गरज आहे. कारण ही सवय आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला महाग पडू शकते. रोज एकसारखंच जेवल्याने तुम्हाला कोणत्या समस्या जाणवू शकतात हे जाणून घ्या...   

2/5

आपल्या ताटात काय आहे यावर आपल्या शरिराचा विकास ठरलेला असतो. म्हणजे जर तुमच्या जेवणात वेगवेगळे पदार्थ नसतील तर तुमच्या शरिराला मिळणार पौष्टिक घटकही कमी होतात. त्यामुळेच शरिरात पौष्टिक घटकांची कमतरता होऊ नये असं वाटत असेल तर रोज एकाच प्रकारचं अन्न सेवन करणं तात्काळ थांबवा.   

3/5

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुमच्या जेवणात वेगवेगळ्या भाज्या असल्या पाहिजेत. याचं कारण म्हणजे जर तुम्ही रोज एकाच प्रकारचं अन्न सेवन केलं तर तुमचं वजन कमी होणार नाही. याउलट तुमचं वजन आहे तितकंच राहील.   

4/5

रोज एकाच प्रकारचं अन्न सेवन केल्यास तुम्हाला Eating Disorder चा त्रास जाणवू शकतो. योग्य प्रकारचं अन्न सेवन न केल्याने ही समस्या जाणवते.   

5/5

या स्थितीत तुम्हाला कुपोषणाचा सामना करावा लागू शकतो. तसंच तुमचं वजनही कमी होतं. याचं कारण म्हणजे तुमचं अन्नावरुन मन उडालेलं असतं.