पोटाच्या समस्यांसाठी रामबाण आहे Coconut Water; जाणून घ्या फायदे

नारळ पाणी आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानलं जातं. याचे अनेक गुणकारी फायदे आहेत.

Sep 03, 2020, 16:41 PM IST

पोटाच्या समस्यांसाठी नारळ पाणी रामबाण मानलं जातं. नारळ पाण्यात व्हिटॅमिन, पोटॅशियम, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, खनिज तत्त्व भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळेच हे आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं. जाणून घ्या याचे काही जबरदस्त फायदे...

1/5

ज्या लोकांना उच्च रक्तदाब-हाय ब्लड प्रेशरची समस्या असते, त्यांनी आपल्या डाएटमध्ये नारळ पाण्याचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. नारळ पाण्यात असलेल्या व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम आणि पोटॅशियममुळे व्यक्तीचं ब्लड प्रेशर नॉर्मल राहण्यास मदत होते.

2/5

उन्हाळ्यात मुरुमं आणि डागांची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशात नारळ पाण्यामुळे मुरुमांची समस्या दूर करण्यास मदत होते. याचा वापर चेहऱ्यावर फेसपॅकसाठीही करता येऊ शकतो.

3/5

पोटदुखी, ऍसिडिटी, अल्सर, कोलायटिस, आतड्यांना सूज येणं अशा समस्यांमध्ये रिकाम्या पोटी थोडं-थोडं नारळ पाणी पिण्याने आराम मिळू शकतो. नारळ पाणी उर्जेचा चांगला स्त्रोत असल्याने थकवा, चक्कर येणं अशा स्थितीतही नारळ पाणी गुणकारी ठरतं.

4/5

नारळ पाणी किडनी स्टोन-मुतखडा होण्याच्या समस्येवरही फायदेशीर आहे. 

5/5

दररोज नारळ पाणी पिण्याने शरीर हायड्रेटेड राहतं आणि त्यासोबतच शरीरात ग्लुकोजचा स्तरही नॉर्मल राहण्यास मदत होते.