नाशिक जिल्ह्यात मुसळधार; त्र्यंबकेश्वर जलमय

Jul 07, 2019, 19:37 PM IST
1/6

नाशिक जिल्ह्यात आज एकूण ६७८ मिलिमीटर पावसाची दमदार नोंद झाली आहे.

2/6

यात प्रामुख्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात १३५ मिलिमीटर, इगतपुरी १७० मिलिमीटर आणि पेठसूरगाण्यांमध्ये १०४ मिलिमीटर इतका पाऊस झाला.

3/6

त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण शहर जलमय झाले असून लोकांना पाण्यातून वाट काढत जावे लागते आहे. 

4/6

नाशिक जिल्ह्यात दमदार झालेल्या पावसामुळे त्र्यंबकेश्वर शहर पूर्णत: जलमय झाले आहे. घराघरात पाणी घुसले असून अनेक कार, दुचाकी पाण्यामध्ये आहेत. 

5/6

इगतपुरी तालुक्यातील दारणा धरणात २६ टक्के, भावलीमध्ये ३४ टक्के तसेच नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहामध्ये १६ आणि कश्यपीमध्ये ९ टक्के पाणीसाठा झाला आहे.

6/6

गेल्या दहा-बारा तासांपासून संततधार सुरू असल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे.