नाशिकमध्ये रविवारी मुसळधार पाऊस, पूरसदृश्य परिस्थितीची छायाचित्रे

इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात सतत होणाऱ्या पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 

Jul 10, 2019, 13:06 PM IST

नाशिकमध्ये मागील २४ तासांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात सतत होणाऱ्या पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील काही भागांमध्ये कंबरेपर्यंत पाणी भरले आहे. त्याचबरोबर लोकांच्या घरात देखील पाणी भरले आहे. इगतपुरीमध्ये १७० मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर सर्वात जास्त पाऊसाने प्रभावीत झालेल्या भागांपैकी त्र्यंबकेश्वर तालुक्यात १३५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

1/9

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती

गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वरच्या उगमस्थानापासून नाशिक शहरापर्यंत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 

2/9

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती

याठिकाणी पाणी कमरेपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नाशिक शहरात गाड्या पाण्यावर तरंगत आहेत. तर काही गड्या वाहून गेल्या आहेत. 

3/9

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती

गाडगे महाराज मंदिराजवळ एक कार पाण्यात अडकली होती. तिला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. शहरात अनेक ठिकाणी हीच परिस्थिती उदभवली होती.

4/9

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती

तीन वर्षांआधी नाशिक शहरात असाच पूर आला होता. तेव्हा येथील सांडपाणी व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह अपस्थित करण्यात आला होता. सलग तिसऱ्या वर्षानंतरही परिस्थितीत काही बदल झाल्याचे दिसून येत नाहीत. 

5/9

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती

गोदावरीच्या उगम स्थानावर काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे पाणी साचण्याच्या समस्येत मोठी वाढ झाली आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा नसल्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

6/9

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती

रामकुंडामध्ये देखील पाणी साचले आहेत. शहरातील छोटे तलाव देखील तुडूंब भरून वाहत आहेत. विशेष म्हणजे ब्रम्हगिरी तलावाने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

7/9

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती

सतत होणाऱ्या पावसामुळे डोंगराळ भागातून झरे वाहू लागले आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास पूर येण्याची भिती स्थानिकांना सतावत आहे. 

8/9

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती

रत्नागिरीमध्ये होत असलेल्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग तब्बल ११ तासांसाठी बंद करण्यात आला होता. सतत होणाऱ्या पावसामुळे खेड तालुक्यातील जगबुडी आणि नारंगी या नद्यांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.

9/9

नाशिकमध्ये रविवारी मुसळधार पाऊस, पूरसदृश्य परिस्थितीची छायाचित्रे

नाशिकमध्ये रविवारी मुसळधार पाऊस,  पूरसदृश्य परिस्थितीची छायाचित्रे

जगबुडी नदीवर असलेला पूल ब्रिटीश कालीन असल्यामुळे येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. नदीमधील पाण्याच्या पातळीत सतत वाढ होत आहे. त्यामुळे येथील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी येथे वाहतूक कोंडी झाली.