RRR ते भूल भुलैया 2, श्रद्धा कपूरने नाकारले 'हे' 5 हिट चित्रपट, त्यापैकी एकाला मिळाला आहे ऑस्कर

श्रद्धा कपूरने 'स्त्री 2' चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपट नाकारले आहेत. ज्यामधील एका चित्रपटाला ऑस्कर देखील मिळाला आहे. कोणते आहेत ते चित्रपट? जाणून घ्या सविस्तर

| Aug 15, 2024, 14:54 PM IST
1/6

अभिनेत्री श्रद्धा कपूर

अभिनेत्री श्रद्धा कपूरचा 'स्त्री 2' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात श्रद्धा मुख्य भूमिकेत आहे. मात्र, तुम्हाला माहिती आहे का की श्रद्धा कपूरने अनेक हिट चित्रपट नाकारले आहेत. 

2/6

भूल भुलैया 2

2022 मध्ये प्रदर्शित झालेला 'भूल भुलैया 2' हा हिट चित्रपट अभिनेत्री श्रद्धा कपूरने नाकारला होता. श्रद्धा कपूरनंतर ही भूमिका कियारा आडवाणीला ऑफर करण्यात आली.   

3/6

RRR

एसएस राजामौली यांनी 'RRR'मध्ये ज्युनियर एनटीआरच्या विरुद्ध भूमिकेसाठी श्रद्धा कपूरशी संपर्क साधला होता. परंतु तिने तिच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ही ऑफर नाकारली. चित्रपट सुपरहिट झाला आणि त्यामधील नातू नातू या गाण्याला ऑस्करही मिळाला. 

4/6

ठग्स ऑफ हिंदोस्तान

श्रद्धा कपूरला 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाची ऑफर आली होती. मात्र, अभिनेत्रीने ती नाकारली. याचे कारण उद्याप कोणालाच कळू शकले नाही. 

5/6

सायना

अभिनेत्री श्रद्धा कपूरने अनेक दिवस सराव करुन सायना नेहवालच्या बायोपिक 'सायना'मधून बाहेर पडून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यानंतर तिची जागा परिणीती चोप्राने घेतली. या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. 

6/6

Lucky

सलमान खानचा 'Lucky' चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. मात्र, या चित्रपटातील गाणी खूप हिट ठरली. या चित्रपटात श्रद्धा कपूरने मुख्य भूमिका साकारावी अशी सलमान खानची इच्छा होती. परंतु तिने शिक्षण पूर्ण करायचे असल्याने हॉ ऑफर नाकारली.