भरपूर स्पेस, भरपूर मायलेज, 5.32 लाखांची 'ही' आहे 7 सीटर फॅमिली कार

आरामदायी प्रवास करण्यासाठी या आहेत 3 आरामदायी 7 सीटर कार. किंमत आणि मायलेजबद्दल जाणून घ्या सविस्तर 

| Aug 10, 2024, 19:36 PM IST
1/6

अधिक आसनक्षमता

भारतात मोठ्या आणि अधिक आसनक्षमता असलेल्या कारला खूप मागणी आहे. कारण अशा कार मोठ्या कुटुंबांसाठी आणि लांबच्या प्रवासासाठी सर्वात योग्य मानल्या जातात. 

2/6

आरामदायक प्रवास

कौटुंबिक सहलीला जाण्यासाठी प्रत्येकजण मोठ्या गाड्या शोधत असतो. त्यामुळे लोक 7 सीटर कार घेण्यास पहिले प्राधान्य देतात. 

3/6

7 सीटर कार

आज आम्ही तुम्हाला अशा 3 परवडणाऱ्या 7 सीटर कारबद्दल सांगणार आहोत ज्यांची सुरुवातीची किंमत फक्त 5.32 लाख रुपये आहे. 

4/6

मारुति Ertiga

मारुति Ertiga ची 8.69 लाख रुपये किंमत आहे. या कारमध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन आहे आणि ते CNG प्रकारात देखील उपलब्ध आहे. ही कार पेट्रोलमध्ये 20 किमी प्रतिलिटर मायलेज देते आणि CNG मध्ये 26.11 किमी पर्यंत मायलेज देते. 

5/6

रेनॉल्ट ट्राइबर

रेनॉल्ट ट्राइबर कारची किंमत 6 लाख रुपये आहे. ही 7 सीटर कार आहे. यात 1 लिटर क्षमतेचे एस्पिरेटेड आणि टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनचा पर्याय आहे. ही कार 19 किमी प्रतिलिटर मायलेज देते. 

6/6

मारुति ईको

मारुति ईकोची किंमत 5.32 लाख रुपये आहे. या कारला 1.2 लिटर क्षमतेचे K-Series ड्युअल-जेट WT पेट्रोल इंजिन आहे. ही कार पेट्रोल मोडमध्ये 19.71 किमी प्रतिलिटर आणि CNG मोडमध्ये 26.78 किमी मायलेज देते.