भारताबाहेर नोकरी शोधताय? जाणून घ्या सर्वाधिक पगार देणारे 5 देश

सर्वाधिक पगार देणारे 5 देश, भारताबाहेर जाण्याआधी माहिती करुन घ्या 

| Jun 26, 2023, 16:02 PM IST

सर्वाधिक पगार देणारे 5 देश, भारताबाहेर जाण्याआधी माहिती करुन घ्या 

1/5

लक्झेंबर्ग

Highest Salary paying 5 Forign Countries

लक्झेंबर्ग हा पश्चिम युरोपमध्ये वसलेला एक छोटासा देश आहे. या देशात इतर देशांपेक्षा अधिक कमाई करता येते. रिपोर्ट्सनुसार, येथील कर्मचाऱ्यांना वार्षिक 48 लाख रुपयांपर्यंत पगार दिला जातो. यासोबतच इतरही अनेक सुविधा उपलब्ध आहेत. तुम्हाला परदेशात जाऊन नोकरी करायची असेल, तर हा देश तुमच्या विशलिस्टमध्ये असला पाहिजे.

2/5

स्वित्झर्लंड

Highest Salary paying 5 Forign Countries

 देश जगभरातील लोकांसाठी स्वप्नवत ठिकाण आहे. कमाईच्या बाबतीतही स्वित्झर्लंड जगातील अव्वल देशांमध्ये येतो. येथे नोकरी करून तुम्ही सरासरी 45 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न मिळवू शकता.

3/5

डेन्मार्क

Highest Salary paying 5 Forign Countries

जीवनमानाच्या बाबतीत हा देश जगातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक मानला जातो. येथील लोकांकडे भरपूर पैसा आहे, ज्यामुळे येथे चांगले जीवनमान जगता येते. येथील सरासरी पगार 41 लाख रुपयांपर्यंत आहे. तुमच्या पदानुसार हा पगार बदलू शकतो.

4/5

नेदरलँड

Highest Salary paying 5 Forign Countries

कमाईच्या बाबतीत, नेदरलँड्सचाही जगातील अव्वल देशांमध्ये समावेश आहे. येथे राजधानी अॅमस्टरडॅम हे जागतिक शहर म्हणून ओळखले जाते. येथील लेबर लॉजही खूप चांगले मानले जातात. नेदरलँडमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार साधारण 40 लाख रुपये आहे.

5/5

बेल्जियम

Highest Salary paying 5 Forign Countries

कमाईच्या बाबतीतही बेल्जियम खूप चांगला देश आहे. येथे इंग्रजी समजू शकणारे लोकही खूप आहेत. भारतीयांसाठीही हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. येथे बहुतांश कार्यालयीन कामकाज इंग्रजीतच केले जाते. पगाराबद्दल बोलायचे झाले तर, कर्मचाऱ्यांना सरासरी 38 लाख रुपयांपर्यंत वेतन दिले जाते.