समोर कैलाश, पायाखाली हजारो फूट खोल दरी; पाहताक्षणी थरकाप उडवणारी ही जागा भारतात नेमकी कुठंय?

Himachal Pradesh Kalpa : अनेक मंडळी तर, दरवर्षी या राज्याला भेट देतात आणि तिथं रमतात. अशा या राज्यात एक असं ठिकाण आहे जे पाहून तुमचा थरकापच उडेल.   

Sep 25, 2023, 17:41 PM IST

Himachal Pradesh Kalpa : भटकंती करणाऱ्या अनेकांच्याच यादीमध्ये हिमाचल प्रदेश अग्रस्थानी असतं. हिमाचलमध्ये असणाऱ्या दूर डोंगरमाथ्यांवरील गावांमध्ये निवांत क्षण व्यतीत करण्याची बऱ्याचजणांची इच्छा असते. 

1/7

विशलिस्ट

Himachal Pradesh kalpa suicide point travel tourist attraction

Himachal Pradesh Kalpa : हिमाचलही तुमच्या विशलिस्टमधील एक ठिकाण आहे का? मग यंदा तिथं एका अशा गावाला भेट द्या जे तुम्हाला भारावून सोडेल.   

2/7

हिमाचल आणि तिथला निसर्ग

Himachal Pradesh kalpa suicide point travel tourist attraction

ही जागा किंबहुना हे गाव क्षणोक्षणी, प्रत्येक वळणावर तुमच्यासाठी निसर्गाचं नवं रुप आणेल. कारण हिमाचल आणि तिथला निसर्ग तुम्हाला थक्क करण्यासाठी सज्ज असतो.   

3/7

घाबरू नका...

Himachal Pradesh kalpa suicide point travel tourist attraction

या गावात असणारं एक ठिकाण आहे ते म्हणजे 'सुसाइड पॉइंट'. घाबरू नका, इथं काही चुकीचे प्रकार घडत नाहीत. पण, इथून खोल दरी पाहताना थरकाप उडाल्यावाचून राहणार नाही.   

4/7

किन्नौर

Himachal Pradesh kalpa suicide point travel tourist attraction

हिमाचलच्या किन्नौर जिल्ह्यातील कल्पा गावापासून अवघ्या 3 किमी अंतरावर हा सुसाईड पॉईंट आहे. अतिशय वळणाच्या रस्त्यावरच खडकाचा असा भाग पुढे आला आहे जणू एक आडवा पडलेला सुळका.   

5/7

सावधगिरी बाळगा

Himachal Pradesh kalpa suicide point travel tourist attraction

सुसाईड पॉईंटवरून वाहन चालवतानाही ते धीम्या गतीनं चालवण्याचं आवाहन प्रशासन करतं. इतकंच काय, तर इथं येणाऱ्या पर्यटकांना फोटो काढतानाही सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं जातं.   

6/7

निसर्ग सौंदर्य भारावून टाकणारं

Himachal Pradesh kalpa suicide point travel tourist attraction

या सुसाईड पॉईंटच्या समोरच किन्नर कैलाशची पर्वतरांगही दिसते. त्यामुळं इथं येऊन निसर्ग सौंदर्य न्याहाळणाऱ्यांचा आकडा मोठा आहे.   

7/7

इथं नक्की या!

Himachal Pradesh kalpa suicide point travel tourist attraction

थोडक्यात इथून पुढं हिमाचल प्रदेशला जाण्याचा बेत आखणार असाल तर कल्पा गावाला आणि या अविश्वसनीय ठिकाणाला नक्की भेट द्या. इथं येऊन मोकळ्या आभाळाकडे एकटक पाहत राहिल्या तुमचा सर्व क्षीण दूर जाईल हे नक्की.