हिमाचलमध्ये निसर्गाची शुभ्र उधळण

Nov 28, 2019, 10:47 AM IST
1/6

हिमाचलमध्ये निसर्गाची शुभ्र उधळण

थंडीची लाट सध्या देशातील काही भागांमध्ये पाहायला मिळत आहे. यामध्ये सर्वाधिक परिणाम हे हिमाचल प्रदेश येथे झाल्याचं कळत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या वृत्तानुसार हिमाचल प्रदेशातील बहुतांश भागांमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाल्याचं स्पष्ट होत आहे. (छाया सौजन्य- एएनआय/ ट्विटर)

2/6

हिमाचलमध्ये निसर्गाची शुभ्र उधळण

सध्याच्या घडीला कुल्लू, किलाँग परिसरात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. (छाया सौजन्य- एएनआय/ ट्विटर)

3/6

हिमाचलमध्ये निसर्गाची शुभ्र उधळण

हिमाचल प्रदेशातील या बर्फवृष्टीमुळे निसर्गाने अगदी मुक्त हस्ताने या भागावर शुभ्र उधळण केली आहे असं म्हणायला हरकत नाही. (छाया सौजन्य- एएनआय/ ट्विटर)

4/6

हिमाचलमध्ये निसर्गाची शुभ्र उधळण

पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या या भागात सध्या रस्ते वाहतुकीवरही तापमानातील या बदलामुळे परिणाम झाले आहेत. (छाया सौजन्य- एएनआय/ ट्विटर)

5/6

हिमाचलमध्ये निसर्गाची शुभ्र उधळण

मनाली येथून रोहतांग मार्गाने लाहौल-स्पितीला जोडणारा निर्माणाधीन बोगदाही कोणताच अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंद करण्यात आला आहे. (छाया सौजन्य- एएनआय/ ट्विटर)

6/6

हिमाचलमध्ये निसर्गाची शुभ्र उधळण

एकंदरच येत्या काही दिवसांमध्येही या भागांमध्ये जोरदार बर्फवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्या धर्तीवर शाळा, महाविद्यालयांनाही सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. तर, स्थानिक प्रशासनाकडूनही योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. (छाया सौजन्य- एएनआय/ ट्विटर)