रंगांनी न्हाऊन निघाले रामलल्ला; 'रंगभरी एकादशी'निमित्त अयोध्येत रंगांची उधळण; पाहा फोटो

Holi in Ayodhya 2024: अयोध्या नगरीमध्ये रामलल्ला मंदिरात विराजमान झाल्या क्षणापासून इथं येणाऱ्या भाविकांचा आकडा वाढतच चालला आहे. त्यातच होळीनिमित्तसुद्धा भाविक मोठ्या संख्येनं इथं आल्याचं पाहायला मिळत आहे. 

Mar 21, 2024, 13:16 PM IST

Holi in Ayodhya 2024: होळीचा उत्साह आता देशभरात खऱ्या अर्थानं रंगू लागला आहे असं म्हणायला हरकत नाही. तिथं मथुरा, वृंदावनात होळीच्या रंगांची उधळण सुरु असताना आणि जागतिक स्तरावर या सणाचीच चर्चा सुरु असताना इथं अयोध्येतही यंदाची होळी खास ठरत आहे. 

1/8

भाविकांची रिघ

Holi 2024 Ayodhya ram mandir ram lalla idol deocared with colors see photos

अयोध्येतील राम जन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या रामलल्लांच्या सुरेख मंदिराकडेच सध्या भाविकांचा ओघ दिसत आहे. राम लल्लाचं मोहक रुप मनात साठवण्यासाठी इथं भारतातूनच नव्हे, तर परदेशातूनही नागरिकांची गर्दी वाढताना दिसत आहे. 

2/8

अयोध्येतील होळी

Holi 2024 Ayodhya ram mandir ram lalla idol deocared with colors see photos

गेल्या काही दिवसांपासून हा राबता वाढला आहे आणि त्यामागचं कारण ठरतंय ती म्हणजे अयोध्येतील होळी.   

3/8

सणाला कमालीचं महत्त्वं

Holi 2024 Ayodhya ram mandir ram lalla idol deocared with colors see photos

मुळातच उत्तर भारतात होळी आणि रंगांची उधळण होणाऱ्या या सणाला कमालीचं महत्त्वं आहे आणि अयोध्याही यास अपवाद नाही. 

4/8

राम जन्मभूमी

Holi 2024 Ayodhya ram mandir ram lalla idol deocared with colors see photos

अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरातही होळीचाच माहोल पाहायला मिळाला. जिथं रंगभरी एकादशीनिमित्त खुद्द राम लल्ला यांनाही रंग लावण्यात आले. 

5/8

रंगांची उधळण

Holi 2024 Ayodhya ram mandir ram lalla idol deocared with colors see photos

रंगभरी एकादशीनिमित्त हनुमानगढी परिसरातही भाविक आणि साधुसंतांनी होळी साजरा करत रंगांची उधळण केली. 

6/8

रंगभरी एकादशी

Holi 2024 Ayodhya ram mandir ram lalla idol deocared with colors see photos

रंगभरी एकादशीच्या निमित्तानं अयोध्येमध्ये होळीच्या मंगल आणि तितक्याच बहुरंगी पर्वाची सुरुवातही झाली. त्यातही यंदा खुद्द रामलल्लांसोबत धुळवड खेळता येणार असल्यामुळं येथील भाविकांमध्ये भलताच आनंद पाहायला मिळाला. 

7/8

अयोध्येत भाविक दाखल

Holi 2024 Ayodhya ram mandir ram lalla idol deocared with colors see photos

होळीच्या निमित्तानं अयोध्येत भाविक दाखल होण्याचं सत्र सुरुच असून अपेक्षित गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासन आणि उत्तर प्रदेश सरकारकडून सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. 

8/8

अयोध्यानगरी

Holi 2024 Ayodhya ram mandir ram lalla idol deocared with colors see photos

होलिका दहन आणि आठवड्याचा अखेर एकत्रच आल्यामुळं सुट्टीच्या या दिवसांत अयोध्यानगरी भाविकांनी खुलून जाणार आहे, तर इथं रंगांची अमर्याद उधळण अविरतपणे पाहता येणार आहे.