खुशखबर! दिवाळीच्या मुहूर्तावर घरी घेऊन या 'Honda Prologue Electric SUV'

मुंबई : ऑटोमोबाईलच्या क्षेत्रातील नामांकित आणि लोकप्रिय असलेल्या Honda कंपनीने Prologue Electric SUV या कारला लॉंच केलं आहे. सर्वात्र चर्चेत असलेल्या Honda Prologue Electric या कारच्या फीचर्सबद्दल जाणून घेण्यासाठी वाचा...

Oct 08, 2022, 08:59 AM IST
1/5

Honda Prologue Electric Design

होंडा कंपनीच्या Prologue या इलेक्ट्रिक एसयूव्हीला अमेरिकेतल्या लॉस एंजिल्सच्या डिझाईन स्टूडियोने डिझाइन केलं आहे. या सिग्नेचर फ्रंट ग्रिल आणि हॉरिजॉन्टल प्लेस्ड एलईडी हेडलँपसोबत खरेदी करता येते. यामध्ये नव्या डिझाइनचे 21 इंचाचे व्हिल्स दिले आहेत. त्याचबरोबर, कारच्या मागच्या बाजूला EV मॉडेलमध्ये रेगुलर ब्रँड ऐवजी होंडा लेटरिंग उपलब्ध आहे.

2/5

Honda Prologue Electric Size

होंडाच्या या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये 3,094mm आकाराचे व्हिलबेस दिले आहेत. याशिवाय, येऊ घातलेल्या Prologue EV कारची लांबी 4,877mm असून, उंची 1,643mm  आणि रुंदी 1,989 mm असेल.

3/5

Honda Prologue Electric Features

या SUV कारमध्ये डॅशबोर्डवर डिजिटल स्क्रिन उपलब्ध आहे. यामध्ये 11 इंच आकाराचा इंस्ट्रमेंट पॅनल आणि 11.3 इंच आकाराची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम मिळते. यासोबतच, एअर कंडीशनिंग कमांडसाठी कंपनीने टच यूनिट ऐवजी फिजिकल बटन दिलं आहे.

4/5

Honda Prologue Electric Battery

Honda कंपनीकडून अद्याप 2024 Prologue EV या कारच्या टेक्निकल फीचर्सबद्दल कोणताही खुलासा झाला नाही. असं असलं तरी रिपोर्ट्सनुसार, यामध्ये मिड साइजचा Ultium बॅटरी पॅक दिला जाईल, ज्यामध्ये ड्युअल इलेक्ट्रिक मोटर्स जोडला जाईल.

5/5

Honda Prologue Electric Launching

होंडा कंपनीची अपकमिंग Electric SUV ही कार 2 वर्षांत काही ठरावीक इंटरनॅशनल मार्केटच्या सेलमध्ये उपलब्ध असणार आहे. पण, भारतातील लॉंचिंग संदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.