HONDA ने सगळा गेमच पालटला! HERO ला धोबीपछाड; जुलै महिन्यात रेकॉर्डब्रेक विक्री

हिरो मोटोकॉर्पची बेस्ट सेलिंग मॉडेल स्प्लेंडर आहे, तर होंडाकडे अॅक्टिव्हा आहे. अनेक काळापासून पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या हिरो मोटोकॉर्पला आता दणका बसला आहे.   

| Aug 07, 2024, 18:15 PM IST

हिरो मोटोकॉर्पची बेस्ट सेलिंग मॉडेल स्प्लेंडर आहे, तर होंडाकडे अॅक्टिव्हा आहे. अनेक काळापासून पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या हिरो मोटोकॉर्पला आता दणका बसला आहे. 

1/8

भारतीय बाजारपेठेत दुचाकी ब्रँडमध्ये होंडा आणि हिरो सर्वात लोकप्रिय आहेत. बाजारात या दोन्ही कंपन्यांमध्ये तगडी स्पर्धा असते.   

2/8

हिरो मोटोकॉर्पची बेस्ट सेलिंग मॉडेल स्प्लेंडर आहे, तर होंडाकडे अॅक्टिव्हा आहे. अनेक काळापासून पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या हिरो मोटोकॉर्पला आता दणका बसला आहे.   

3/8

जुलै महिन्यातील विक्रीत जापानी कंपनी होंडाने हिरो मोटोकॉर्पला मागे टाकलं असून घरगुती बाजारपेठेत सर्वाधिक विक्री केली आहे.   

4/8

होंडाने हिरोला ओव्हरटेक करण्याची ही तिसरी वेळ आहे. विक्रीत हिरो मोटोकॉर्प जगातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी आहे.   

5/8

होंडाने जुलै महिन्यात भारतीय बाजारपेठेत एकूण 4,39,118 युनिट्स स्कूटर आणि बाईक्सची विक्री केली. तसंच 43,982 युनिट्स एक्स्पोर्ट केले. एकूण 4,83,100 वाहनांची विक्री करण्यात आली.   

6/8

दुसरीकडे Hero Motocorp ने जुलै महिन्यात घरगुती बाजारात 3,47,535, युनिट्सची विक्री आणि 22,739 युनिट्स एक्स्पोर्ट केले. हिरोने एकूण 3,70,224 युनिट्स विकले आहेत.   

7/8

सप्लाय चेन आणि लॉजिस्टिक संबंधित समस्यांमुळे जुलैमध्ये वाहनांची डिलिव्हरी करण्यात समस्या असल्याचं हिरोचं म्हणणं आहे.   

8/8

हिरो आणि होंडाच्या बेस्ट सेलिंग मॉडेल्समध्ये स्प्लेंडर आणि अॅक्टिव्हा आहे. दोन्ही कंपन्या दर महिन्याला या मॉडेल्सच्या तब्बल 2 लाख युनिट्सची विक्री करतं.