आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर चुकूनही बोलू नका 'या' 5 नकारात्मक गोष्टी

बोलताना नेहमी विचार करावा असं आपल्या आपल्या घरातील मोठे नेहमी सांगतात. कारण बोलण्यामुळे आपल्या यशाच्या प्रवासात अडथळे येऊ शकतात. पण या गोष्टी विषयी तुम्हाला मुळीच माहित नसत. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. कोणत्या 5 गोष्टी तुम्हाला तुमच्या गोल पासून दूर करू शकतात. 

| Aug 07, 2024, 17:45 PM IST
1/7

अनेकदा बोलता कळत न कळत तुम्ही काहीही बोलून जाता. पण अनेक सायकोलॉजिस्टचं म्हणणं आहे की आमचं प्रत्येक वाक्य हे आपल्या मेंदूवर परिणाम करत असतं. त्यामुळे काही गोष्टी आहेत ज्या आपण मुळीच बोलायला नको. 

2/7

'माझ्यासोबतच नेहमी असं का होतं?' जर तुम्ही देखील अशा गोष्टी बोलतात तर यूनीव्हर्स तुम्हाला ते सिद्ध करून दाखवतं. त्यामुळे तुमचं भविष्य हे तुम्हीच न कळत खराब करू लागतात. 

3/7

'पैशांची कमतरता कधी संपत नाही.' जर तुम्ही सतत हेच बोलत रहाल तर पैशांसोबत असलेलं तुमचं नातं तुम्ही स्वत: खराब करतात. त्याच्या पुढे तुमच्याकडे पैसे येणं तिथेच थांबून जाईल.   

4/7

'माझ्या आयुष्यात प्रेमच नाही', अशी वक्तव्य केल्यानं तुम्ही तुमच्या आजूबाजून नकारात्मकता पसरवू लागतात. ज्यामुळे कोणाची इच्छा असली तरी तुमच्यावर प्रेम करू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही स्वत: तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना तुमच्यापासून दूर करतात. 

5/7

'जग खूप वाईट आहे.' जर तुम्ही सतत असं बोलत राहिलात तर तुम्हाला प्रत्येक व्यक्तीमध्ये वाईटच दिसेल. तुमचं नातं प्रत्येक व्यक्तीसोबत खराब होऊ लागेल. त्यामुळे तुम्ही खूप चिडचिड करू लागाल.  

6/7

'मला हे जमणार नाही', कोणतंही काम सुरु करण्याआधी जर तुम्ही सतत हेच बोलत रहाल तर खूप मोठी शक्यता आहे की तुमचं काम कधी पूर्ण होऊ शकणार नाही. यूनीव्हर्स तेच करतं जे तुम्ही बोलता. त्यामुळे विचार करून बोलण गरजेचं आहे.   

7/7

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)