कसं असतं सेलिब्रिटींच्या शाळेतील स्नेहसंमेलन? शाहरुखच्या मुलासह बिग बींच्या नातीनं वेधलं लक्ष

शाहरुख खान, त्याची पत्नी गौरी खान आणि मुलगी सुहाना खान धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात उपस्थित होते. या इव्हेंटमध्ये त्यानी त्याच्या धाकट्या मुलाला म्हणजेचं अबराम खानला चिअर केले. याच इव्हेंटमध्ये ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, आणि अमिताभ बच्चनही दिसले, जे त्यांची मुलगी आराध्याला प्रोत्साहन देण्यासाठी आले होते.    

| Dec 20, 2024, 13:24 PM IST
1/7

या कार्यक्रमातील मुख्य आकर्षण म्हणजे अबराम आणि आराध्याने सादर केलेले ख्रिसमस थीमवर आधारित नाटक. दोघांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. आराध्याने लाल रंगाचा स्वेटर परिधान केले होते, तर अबराम पांढऱ्या स्वेटरवर लाल मफलर घालून खूपच गोड दिसत होता. या सादरीकरणामुळे चाहत्यांना शाहरुख आणि ऐश्वर्याच्या जुनी ऑनस्क्रीन केमिस्ट्रीची आठवण झाली.  

2/7

शाहरुख खान आणि ऐश्वर्या रायने 'मोहब्बते', 'जोश', 'देवदास' आणि 'ए दिल है मुश्किल' यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी नेहमीच पसंती दिली होती. दोघांना एकत्र स्क्रिन शेअर करून आता बराच काळ झाला आहे, पण चाहत्यांच्या मनात त्यांच्या अभिनयाची छाप अजूनही ताजी आहे.    

3/7

इव्हेंटमध्ये शाहरुख आपल्या मुलाचा परफॉर्मन्स रेकॉर्ड करताना दिसला. गौरी आणि सुहाना, अबरामच्या अभिनयाचा आनंद घेत होत्या. त्याच वेळी, अभिषेक आणि ऐश्वर्या त्यांच्या मुलीचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यात व्यस्त होते. अमिताभ बच्चन त्यांच्या नातीच्या कामगिरीकडे कौतुकाने आणि अभिमानाने पाहत असल्याचे दिसले.    

4/7

या इव्हेंटमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्स आपल्या मुलांना सपोर्ट करण्यासाठी आले होते. सैफ अली खान, करीना कपूर, मीरा राजपूत, रितेश देशमुख, जेनेलिया डिसूझा, पृथ्वीराज सुकुमारन आणि मनीष मल्होत्रा ​​यांचा यात समावेश होता. या कार्यक्रमामुळे सेलिब्रिटी एकत्र पाहायला मिळाले.  

5/7

गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या अफवा चर्चेत होत्या. 'दसवी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिषेक आणि अभिनेत्री निमरत कौरच्या जवळिकीच्या बातम्यांमुळे या अफवा अधिक गाजल्या. याशिवाय ऐश्वर्याने बच्चन कुटुंबाचे घर सोडल्याचीही चर्चा झाली होती.  

6/7

परंतु काही दिवसांपूर्वी एका लग्नसमारंभात ऐश्वर्या आणि अभिषेकने एकत्र फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे त्यांच्या विभक्त होण्याच्या अफवांना पूर्णविराम मिळाला. या फोटोंमुळे चाहत्यांना दिलासा मिळाला की हे स्टार कपल एकत्र आहे.  

7/7

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी 2007 मध्ये थाटामाटात लग्न केले होते. चार वर्षांनी 2011 मध्ये त्यांच्या आयुष्यात आराध्या बच्चनचे आगमन झाले. आजही हे जोडपे त्यांची मुलगी आराध्यासह एकत्रित वेळ घालवत आनंदी कुटुंबाचे उत्तम उदाहरण ठरत आहे.