एवढ्या स्वस्तात इंटरनेट देणं अंबानींना कसं परवडतं? JIO च्या यशाचं सिक्रेट आलं समोर

Jio Recharge Cheap Data Reason: सध्याच्या घडीला भारतामधील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये जिओ अग्रस्थानी आहे. त्यांनी अवघ्या काही वर्षांमध्ये अनेक दिग्गज कंपन्यांना मागे टाकले ते आपल्या किंमतीसंदर्भातील आक्रमक धोरणांमुळे. मात्र जिओला एवढ्या स्वस्तात इंटरनेट देणं कसं परवडतं? हेच पाहूयात...

| Aug 20, 2024, 09:43 AM IST
1/11

Jio Recharge Cheap Data

अवघ्या 8 वर्षांमध्ये जिओने भारतीय बाजारपेठेमधील जवळपास 50 टक्के हिस्सा ताब्यात घेतला आहे. मात्र जिओला हे यश कशामुळे मिळालं? इतरांच्या तुलनेत त्यांच्या सेवा इतक्या स्वस्त का असतात? पाहूयात...

2/11

Jio Recharge Cheap Data

भारतामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानींच्या रिलायन्सच्या मालकीची टेलिकॉम कंपनी जिओ कायमच चर्चेत असते. भारतामधील आघाडीची टेलीकॉम कंपनी असलेल्या जिओच्या ऑफर्स या कायमच स्पर्ध कंपन्यांपेक्षा अधिक आकर्षक असतात. जीओचे सध्या भारतामध्ये 45 कोटींहूनही अधिक युझर्स आहेत.  

3/11

Jio Recharge Cheap Data

भारती एअरटेल, व्होडाफोन-आयडीया यासारख्या आपल्या स्पर्धक कंपन्यांपेक्षा एवढ्या स्वस्त दरामध्ये इंटरनेट देणं जिओला कसं परवडतं? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? याचसंदर्भात जाणून घेऊयात..

4/11

Jio Recharge Cheap Data

मुळात रिलायन्सची मार्केटींगच फार उत्तम आहे. रिलायन्सकडून दिली जाणारी ऑफरच अशी असते की ग्राहक ती नाकारु शकत नाही. रिलायन्सने सुरुवातीला दिवसाला 4 जीबी डेटा मोफत अशी ऑफर दिली होती. तेव्हापासूनच रिलायन्सने टेलीकॉम सेक्टरमध्ये जम बसवण्यास सुरुवात केली.

5/11

Jio Recharge Cheap Data

रिलायन्सने 5 सप्टेंबर 2016 रोजी थेट फोर जी सेवा नेटवर्क देणाऱ्या रिलायन्स जीओची घोषणा केली. त्यानंतर जीओ कंपनीने आणि अंबानींने कधी मागे वळून पाहिलं नाही असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही.

6/11

Jio Recharge Cheap Data

रिलायन्सने जिओची घोषणा केल्यानंतर अवघ्या 6 महिन्यांमध्ये भारत जगातील सर्वाधिक मोबाईल डेटा वापराणार देश ठरला. भारतात जिओच्या लॉन्चिंगआधी 200 मिलियन जीबी डेटा दर महिन्याला वापरला जायचा. त्या तुलनेत जिओच्या लॉन्चिंगनंतर सहा महिन्यात एकूण डेटा वापर 1 बिलियन जीबीपर्यंत गेलं.

7/11

Jio Recharge Cheap Data

रिलायन्सने दिलेला स्वस्त डेटा आणि इतर मोफत गोष्टींमुळे पूर्वी कधीही इंटरनेट न वापरलेला वर्गही जिओचा ग्राहक झाला. जिओने स्वत:चे स्वस्त परवडणारे स्मार्ट आणि बेसिक फोनदरम्यान येतील असे इंटरनेट वापरता येणारे फोन लॉन्च करत नवा ग्राहकवर्गच निर्माण केला.

8/11

Jio Recharge Cheap Data

आता जिओला एवढा स्वस्त डेटा परवडतो कसा? या प्रश्नाबद्दल बोलायचं झालं तर जिओ कंपनीने आपली पालक कंपनी असलेल्या रिलायन्सचाच सेटअप आपल्या सेवांसाठी वापरला. म्हणजेच जिओला नव्याने इन्फ्रास्टक्चरचा खर्च आला नाही. त्यामुळे त्याचा थेट लाभ ग्राहकांना देण्याची शक्कल कंपनीने वापरली.

9/11

Jio Recharge Cheap Data

रिलायन्सच्या आधीपासून उपलब्ध सेटअपमधूनच जिओच्या सेवा दिल्याने ऑप्रेशन कॉस्ट कमी करता आली. तसेच इतर कंपन्यांप्रमाणे वेगवेगळ्या सेवा देण्याऐवजी जिओने केवळ 4 जी वर लक्ष्य केंद्रित केलं. 

10/11

Jio Recharge Cheap Data

रिलायन्सने अगदी मनोरंजनापासून ते पेमेंट सुविधेपर्यंत अनेक गोष्टी अगदी सहज उपलब्ध करुन दिल्याने नवे ग्राहक आपोआपच त्यांच्याकडे ओढले गेले. पहिल्या 2 वर्षातच कंपनीने टेलिकॉम क्षेत्रातील 35 टक्केबाजारपेठ ताब्यात घेतली.

11/11

Jio Recharge Cheap Data

भारती एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि भारत संचार निगम लिमिटेड या जिओच्या प्रमुख स्पर्धक कंपन्या असल्या तरी त्या जिओच्या तुलनेत फार मागे पडल्या आहेत. दिवसोंदिवस जिओ वापरकर्त्यांची संख्या वाढताना दिसत आहे.