PHOTO: मनू भाकरचं नाव कसं पडलं? आईने सांगितला बालपणीचा किस्सा

Manu Bhaker : खेळाच्या महाकुंभात म्हणजेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाज मनू भाकरने अचूक नेम भेदत कांस्यपदकाला गवसणी घातली. फक्त 0.1 गुणांच्या फरकाने मनूचं रौप्यपदक हुकलं. मनूच्या आईने यावेळी तिच्या बालपणीचा किस्सा सांगितला आणि मनू भाकरचं नाव कसं पडलं? यावर खुलासा देखील केला. मी तिला अनेकदा काही गोष्टी करू नकोस म्हणून अडवत आले पण तिने जिद्द सोडली नाही, असं सुमेधा भाकर सांगतात.

| Jul 30, 2024, 16:08 PM IST
1/5

मनू भाकर

ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीमध्ये पदक पटकवणारी मनू भाकर पहिली महिला नेमबाज ठरली आहे. गेल्या 12 वर्षांत भारताने नेमबाजीमध्ये कोणतंही पदक मिळवलं नव्हतं. आता मनूने हा दुष्काळ संपवलाय.

2/5

मुलीवर गर्व वाटतो

अशातच आता मनूच्या अद्वितिय कामगिरीनंतर तिच्या घरी आनंदाला उधाण आलंय. मनूच्या कुटुंबांनी आनंद व्यक्त केला. आम्हाला आमच्या मुलीवर गर्व वाटतो, असं मनूची आई म्हणाली.

3/5

बालपणीचा किस्सा

मनूच्या आईने यावेळी तिच्या बालपणीचा किस्सा सांगितला आणि मनू भाकरचं नाव कसं पडलं? यावर खुलासा देखील केला. मी तिला अनेकदा काही गोष्टी करू नकोस म्हणून अडवत आले पण तिने जिद्द सोडली नाही, असं सुमेधा भाकर सांगतात.

4/5

3 ते 4 तास घरी एकटीच

माझी मुलगी लहान असताना अशी वेळ आली की मला तिला घरी एकटीला ठेवावं लागलं. मला पेपरला जायचं होतं. मी पेपरवरून येईपर्यंत मुलगी एकटी 3 ते 4 तास घरी एकटीच होती, असं मनूच्या आईने सांगितलं.

5/5

माझी इच्छा होती की...

मी घरी येईपर्यंत 4 तासात मनू रडली सुद्धा नव्हती. त्यामुळे मी तिचं नाव मनू ठेवण्याचा निर्णय घेतला, असं सुमेधा भाकर सांगतात. माझी इच्छा होती, मनूने डॉक्टर व्हावं, पण तिने आवड जपली अन् मेडल कमवाले, अशा भावना देखील सुमेधा भाकर यांनी व्यक्त केल्या.