टकीला कसा बनवला जातो? लिंबू व मीठ सोबत तो का प्यायला जातो? कारण जाणून व्हाल अवाक्

तुम्ही कधी विचार केला का? की, टकीला पिताना लिंबू आणि मीठासोबत तो का प्यायला जातो?

Jan 14, 2024, 20:30 PM IST
1/7

टकीला शॉट्स अनेक जण आवडीने घेतात. बार किंवा पबमध्ये टकीला शॉट्स मारण्यासाठी तुम्हाला तरुण पिढी उत्साही दिसेल. 

2/7

पण तुम्हाला माहिती आहे का, की टकीला कसा बनवला जातो? त्याशिवाय तो लिंबू आणि मीठ सोबतच का प्यायला जातो?

3/7

@foodnetwork या Instagram अकाऊंटवर खाण्यापिण्याशी संबंधित मनोरंजक व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. 

4/7

टकीला हे अ‍ॅव्हेव्ह वनस्पतींपासून बनवलं जातं. हे वनस्पती एकत्र करून ते मशीद्वारे चिरलं जातं. मग त्यातील द्रव काढलं जातं. अनेक मशीन्समधून गेल्यानंतर चे डिस्टिस्ड केलं जातं. 

5/7

स्टॅनफोर्ड प्रेस वेबसाइटनुसार असं सांगण्यात आलं की, 19 व्या शतकात टकीला पिण्याची स्पर्धा होती. लोक हे पेय मोठ्या प्रमाणात पित होते. त्यामुळे टकीलाची मागणी वाढली आणि त्यातून निकृष्ट दर्जाचे टकीला तयार होऊ लागलं.   

6/7

मग अशावेळी टकीलाची खराब चव दूर करण्यासाठी त्यासोबत मीठ आणि लिंबू दिलं जाऊ लागलं. तेव्हापासून मेक्सिकन संस्कृतीचा हा प्रकार आज जगभरात प्रसिद्ध झाला. 

7/7

इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला 43 लाख व्ह्यूज आतापर्यंत मिळाले आहेत.