New Parliament Building: जुन्या आणि नव्या संसद भवनात नेमका फरक काय? समजून घ्या 10 पॉईंट्स

New Parliament vs Old Parliament Building: आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भारताच्य नव्या संसद भवनाचे उद्घाटन पार पडले. मागील काही महिन्यांपासून बांधकाम सुरु असलेली संसदेची नवीन इमारत नेमकी कशी आहे, आतापर्यंत अस्तित्वात असलेल्या संसद भवनापेक्षा ती वेगळी कशी आहे, या नव्या इमारतीची वैशिष्ट्ये काय आहेत हे पाहूयात...

| May 29, 2023, 12:18 PM IST
1/10

New Indian Parliament

नवीन संसद भवनाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडत आहे. या उद्घाटनसोहळ्याला सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. दरम्यान या नवीन संसद भवनामध्ये काय विशेष असणार आहे, त्याची रचना कशी आणि मुख्य म्हणजे आताच्या संसद भवनापेक्षा हे संसद भवन कशापद्धतीने वेगळं आहे याबद्दल सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या 'माय गव्हर्मेंट'ने माहिती शेअर केली आहे. पाहूयात जुन्या आणि नव्या इमारतीमधील फरक...

2/10

New Indian Parliament

आताच्या संसद भवनातील राज्यसभेच्या दालनामध्ये 250 खासदार आसनस्थ होऊ शकतात. नवीन इमारतीमध्ये राज्यसभेच्या दालनात 384 आसनं आहेत.

3/10

New Indian Parliament

सध्याच्या संसद भवनातील इमारतीत लोकसभेच्या दालनात 550 सदस्यांसाठी आसनव्यवस्था आहे. नवीन संसद भवनामध्ये ही संख्या 888 इतकी आहे.

4/10

New Indian Parliament

सध्याचं संसद भवन हे 2 हजार 428.16 स्वेअर मीटर क्षेत्रावर पसरलेलं आहे. तर संसदेची नवीन इमारत ही 64 हजार 500 स्वेअर मीटरवर पसरलेली आहे.

5/10

New Indian Parliament

वरिष्ठ सभागृहातील डिझाइन ही राष्ट्रीय फुल अशलेल्या कमाळाच्या पाकळ्यांप्रमाणे आहे. तर लोकसभेतील डिझाइन ही मोरपंखांप्रमाणे आहे. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे.

6/10

New Indian Parliament

नव्या संसदेचं बांधकाम हे अधिक सुरक्षित मानांकनांनुसार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.  

7/10

New Indian Parliament

या नव्या संसदेच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मिती होईल असा दावा सरकारने केला आहे. या संसदेमुळे थेट किंवा अप्रत्यक्षपणे 23 लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.

8/10

New Indian Parliament

या नव्या संसद इमारतीचं बांधकाम करण्यासाठी 26 हजार 45 मेट्रीकटन स्टील वापरण्यात आलं आहे. तर 63 हजार 807 मेट्रीकटन सिमेंट इमारतीच्या बांधकामासाठी वापरण्यात आलं आहे. 

9/10

New Indian Parliament

संसदेची नवी इमारत ही अधिक ऐसपैस आणि सुरक्षित असेल असं सरकारचं म्हणणं आहे. माय गव्हर्मेंटच्या फेसबुक पेजवरुन पोस्ट करण्यात आलेल्या फोटोंमध्ये असं सांगण्यात आलं आहे. या संसदेमधील आसनक्षमतेबरोबरच सभागृहातील एकूण जागाही अधिक असेल.  

10/10

New Indian Parliament

नव्या संसदेमध्ये सर्व आधुनिक सुविधा असतील. यामध्ये भविष्याचा विचार करुन आधुनिक सोयी सुविधांची व्यवस्था करण्यात आली असून अगदी फर्निचरपासून ते बांधकामापर्यंत सर्वच गोष्टींमध्ये यासंदर्भातील काळजी घेण्यात आली आहे.