राष्ट्रवादीत उभी फूट! 'हे' आमदार आणि खासदार अजित पवार यांच्यासह गेले; जाणून घ्या आकडा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अजित पवारांनी शपथ घेतली. तेव्हा राज्याला आता दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. एकाच टर्ममध्ये अजित पवार तिस-यांदा उपमुख्यमंत्री बनलेत. अजित पवारांसोबतच छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अदिती तटकरे यांनीही शपथ घेतली.

Jul 03, 2023, 01:03 AM IST

Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राजभवनावर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या बंडामुळे शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली.राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी 30 आमदार अजित पवारांसह राजभवनात दाखल झाले होते. राष्ट्रवादी पक्षाचे कोणते आणि किती आमदार, खासदार अजित पवार यांच्यासह गेलेत जाणून घ्या. 

1/7

राष्ट्रवादीचे सर्व आमदार माझ्या सोबत असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या खासदारांनी देखील त्यांना पाठिंबा दिला आहे. 

2/7

अनिल पाटील हे देखील अजित पवार यांच्यासह  सत्तेत सहभागी झाले आहेत. 

3/7

अमोल मिटकरी यांनी देखील अजित पवारांसह सरकारला पाठिंबा दिला आहे. 

4/7

रामराजे निंबाळकर देखील अजित पवारांसबोत गेले आहेत. 

5/7

धनंजय मुंडे यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. 

6/7

 छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीम यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. 

7/7

अदिती तटकरे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.