पती- पत्नीच्या वयात नेमकं किती अंतर असावं? जास्त अंतर असल्यास होणारे तोटे पाहून दचकाल

Husband Wife Relaionship : या प्रश्नाचं उत्तर तुम्हाआम्हाला मिळो ना मिळो, पण जाणकार आणि अभ्यासकांच्या मते काही निरीक्षणं मात्र आपल्यापुढं काही रंजक संदर्भ ठेवताना दिसत आहेत.   

Jul 12, 2023, 11:03 AM IST

Relationship News : प्रेमाच्या नात्यात कधीच वय पाहिली जात नाही, मग पती आणि पत्नीच्या नात्यात का बरं हा वयाचा आकडा इतका महत्त्वाचा असतो? 

1/7

प्रेम आणि वयाचं गणित

How much age gap required between husband and wife relationship news

ज्यावेळी आपण एखाद्या पत्नीच्या प्रेमात आकंठ बुडून जातो तेव्हातेव्हा त्या व्यक्तीचं वय हा दुय्यम घटक असतो. कारण, तिथं त्या व्यक्तीचं असणंच सर्वकाही असतं. 

2/7

वयातील अंतर

How much age gap required between husband and wife relationship news

थोडक्यात आमच्यासाठी वय फारसं महत्त्वाचं नाही, असंच स्पष्ट उत्तर अनेकजण देतात. पण, खरंच हे उत्तर आणि प्रत्यक्ष आयुष्याती आव्हानं यांच्यात तफावत नसते का?   

3/7

वयातील अंतर

How much age gap required between husband and wife relationship news

समुपदेशक आणि जाणकारांच्या मते पती- पत्नीच्या नात्यात किमान 4 ते 5 वर्षांचं अंतर असावं. पण, हे अंतर इतकंही जास्त नसावं की वेगळ्याच समस्या तुमच्या नात्यात नवी आव्हानं उभी करतील.... 

4/7

जोडीदार दुखावला जाऊ शकतो

How much age gap required between husband and wife relationship news

जेव्हा नात्यात 'ती' किंवा 'तो' वयानं मोठे असतात तेव्हा त्यांच्याबाबत बरंच बोललं जातं, चर्चा होते. अनेकदा काही अशा प्रतिक्रियाही ऐकायला मिळतात ज्यामुळं जोडीदार दुखावला जाऊ शकतो. 

5/7

नात्यातील तणाव

How much age gap required between husband and wife relationship news

जोडीदाराचं वय आपल्या वयाहून जास्त असल्यास नात्यामध्ये जेव्हाजेव्हा तणावाची परिस्थिती निर्माण होते तेव्हातेव्हा याचा दोष वयातील अंतराला आणि पर्यायी जोडीदाराला दिला जातो. नकळत उदभवणाऱ्या या परिस्थितीमुळं प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण होते. 

6/7

आपण एकमेकांसाठी पूरक नाही का?

How much age gap required between husband and wife relationship news

आपण एकमेकांसाठी पूरक नाही का? हा प्रश्नही पती- पत्नीच्या नात्यात जास्त अंतर असल्यास पडू लागतो. इथं हार्मोनल बदल मोठी भूमिका बजावतात. महिलांचं वय झपाट्यानं वाढत असल्याचं भासतं आणि अशा परिस्थितीत नात्यात चढ- उतार येऊ लागतात.   

7/7

मुलांचा जन्म

How much age gap required between husband and wife relationship news

सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलांच्या जन्माचा. जेव्हा पती किंवा पत्नी यांचं वय जास्त असतं, त्यावेळी मुलांच्या जन्माच्या निर्णयासाठी घाई केली जाते किंवा निर्णय घ्यायला उशिर झाल्यास अनेक अडचणी येतात. त्यामुळं जोडीदाराच्या वयातील अंतर हे फार कमी किंवा फार जास्त नसेल याची काळजी घेतली जाणं महत्त्वाचं.