घरात तुम्ही किती सोनं ठेवू शकता? सरकारचा नियम जाणून घ्या!

भारतात मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जातं. प्रत्येक सणाच्या दिवशी किंवा शुभ कार्याला सोन्याचा दागिना घेण्याची प्रथा आहे. पण तुम्हाला माहितीये तुम्ही घरात किती सोनं ठेवू शकता.

| Aug 20, 2024, 13:20 PM IST

Gold Storage Limit in India: भारतात मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जातं. प्रत्येक सणाच्या दिवशी किंवा शुभ कार्याला सोन्याचा दागिना घेण्याची प्रथा आहे. पण तुम्हाला माहितीये तुम्ही घरात किती सोनं ठेवू शकता.

1/7

घरात तुम्ही किती सोनं ठेवू शकता? सरकारचा नियम जाणून घ्या!

How much gold can you keep at home check  Limit in India

भारतातील नागरिकांसाठी सोनं हा खूप महत्त्वाचा ऐवज आहे. लग्नसमारंभात आवर्जुन सोनं खरेदी केलं जातं. कठिण काळात तेच सोनं गहाण ठेवून तुम्ही कर्ज मिटवू शकता. 

2/7

How much gold can you keep at home check  Limit in India

 सुरक्षेच्या कारणास्तव हल्ली घरात सोनं ठेवलं जात नाही. पण अनेकजण अजूनही घरातच सोनं दडवून ठेवतात. पण तुम्हाला माहितीये का घरात सोनं ठेवायची मर्यादा काय आहे?   

3/7

How much gold can you keep at home check  Limit in India

आयकर विभागाने घरात सोनं ठेवण्यासाठी काही नियम व मर्यादा घालून दिले आहेत. महिला व पुरूष दोघांसाठी ही मर्यादा वेगवेगळी आहे. 

4/7

How much gold can you keep at home check  Limit in India

CBDT (Central Board of Direct Taxes) अंतर्गंत तुम्ही घरात एका मर्यादेपर्यंतच सोनं ठेवू शकतात. या मर्यादेपेक्षा जास्त सोनं घरात ठेवत असाल तर तुम्हाला त्याचे पुरावे सादर करावे लागतात. 

5/7

How much gold can you keep at home check  Limit in India

विवाहित महिला त्यांच्याजवळ 500 ग्रॅम सोनं ठेवू शकतात. तर अविवाहित महिला 250 ग्रॅम सोन ठेवू शकतात. 

6/7

How much gold can you keep at home check  Limit in India

पुरुषांना फक्त 100 ग्रॅम सोनं ठेवण्याची परवानगी आहे. तसंच, नियमांपेक्षा जास्त सोनं घरात ठेवत आहात तर सोन्याच्या खरेदीसंदर्भात तुम्हाला रीसीट दाखवावी लागणार आहे. 

7/7

How much gold can you keep at home check  Limit in India

मर्यादेपेक्षा जास्त दागिने सापडले तर ते सरकारकडून जप्त केले जाणार नाहीत. मात्र, मर्यादेपेक्षा जास्त सोने आढळल्यास त्याची पावती व पुरावे द्यावे लागणार.