चोरी गेलेला मोबाईल परत कसा मिळवायचा? फक्त 'या' 6 गोष्टी करा

स्मार्टफोन चोरी होणं किंवा हरवणं हे प्रत्येकाला चिंतेत टाकणारच असतं. तारण मोबाईल चोरी झाल्यानंतर खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो. पण जर तुमचाही स्मार्टफोन चोरीला गेला तर घाबरु नका. जाणून घ्या हरवलेला मोबाईल परत कसा मिळवायचा.   

| Jul 18, 2023, 16:46 PM IST

स्मार्टफोन चोरी होणं किंवा हरवणं हे प्रत्येकाला चिंतेत टाकणारच असतं. तारण मोबाईल चोरी झाल्यानंतर खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो. पण जर तुमचाही स्मार्टफोन चोरीला गेला तर घाबरु नका. जाणून घ्या हरवलेला मोबाईल परत कसा मिळवायचा. 

 

1/9

स्मार्टफोन हा आता प्रत्येकाचाच आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. अशा स्थितीत जर स्मार्टफोन हरवला तर आपण सगळेच घाबरतो. याचं कारण मोबाईलमध्ये आपली खासगी माहिती, तसंच फोटो, व्हिडीओ असतात जे दुसऱ्याच्या हाती लागण्याची भीती असते. यासह तुमच्या मोबाईलचा वापर करत पैशांचा व्यवहार किंवा घोटाळाही केला जाऊ शकतो. अशा स्थितीत जर तुमचा मोबाईल हरवला तर काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. 

2/9

केंद्र सरकारकडून चोरी झालेल्या मोबाईलची माहिती देण्यासाठी एक वेबसाईट सेंट्रल इक्विपमेंट आईडेंटिटी रजिस्टर (CEIR) सुरु करण्यात आली आहे. या वेबसाईटवर तुम्ही ऑनलाइन पद्धतीने चोरी झालेल्या मोबाईलची माहिती भरु शकता. तुम्ही यामध्ये डिटेल भरल्यानंतर मोबाईलचा शोध सुरु होतो. इतकंच नाही तर मोबाईलचा इतर कोणी वापर करु नये यासाठी वेबसाईटच्या मदतीने ब्लॉकही करु शकता.   

3/9

जर तुमचा स्मार्टफोन हरवला असेल तर सर्वप्रथम एफआयआर नोंदवा.  

4/9

यानंतर CEIR वेबसाइटवर जावे लागेल.  

5/9

यानंतर तुम्हाला तीन पर्याय Block/Lost Mobile, Check Request Status आणि Un-Block Found Mobile दिसतील.   

6/9

त्यानंतर चोरीला गेलेला मोबाईल ब्लॉक करण्यासाठी ब्लॉक/हरवलेल्या मोबाईलवर क्लिक करा.  

7/9

यानंतर स्मार्टफोनचा IMEI नंबर आणि ब्रँड टाकावा लागेल.  

8/9

9/9

त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि OTT टाकावा लागेल. अशा प्रकारे तुमच्या चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध सुरू होईल.