Cooking Tips: थंडीच्या दिवसात लोणी पटकन निघत नाही ? 5 मिनिटात निघेल पटापट लोणी...'ही' टीप येईल कामी

Cooking Tips:  थंडीच्या दिवसात घरच्या घरी लोण्यापासून तूप बनवायला घेतलं कि आपलं खूप वेळ वाया जातो कारण  इतर दिवसांच्या तुलनेत दह्याला पटकन लोणी लागत नाही. 

Jan 28, 2023, 17:43 PM IST

cooking hacks: लोणी बनवण्यासाठी आपण काय करतो तर साय साठवून त्याला विरजण लावतो आणि रवीने ते घुसळतो. पण थंडीच्या दिवसात बऱ्याचदा, लोणी निघायला वेळ लागतो अशावेळी काही टिप्स (cooking tips ) आहेत ज्या वापरल्या तर तुम्ही फार वेळ न घालवता 5 मिनिटात मोठं बाउल भरून सहज लोणी काढू शकता

1/5

लोणी करताना आपण काय करतो तर विरजण लावून तयार झालेलं दही फ्रीझमधून बाहेर काढतो आणि रवीने घुसळायला घेतो.

2/5

एक पसरट भांड घ्या त्यात गरम पाणी घाला दह्याचं पातेलं त्यात ठेवा.

3/5

एकदम थंड दही असेल तर लोणी निघायला वेळ लागतो.गरम भांड्यात दह्याचं भांड ठेऊन दही घुसळले तर खूप लवकर तुम्ही लोणी काढू शकता. 

4/5

आता दही घुसळल्यावर ते मोठ्या चाळणीने गाळून घ्या. असं केल्यास पाणी गाळले जाऊन लोणी चाळणीत जमा होईल. 

5/5

हे लोणी एका पातेल्यात घ्या छान गरम करा आणि साजूक तूप तयार.