Indian Railways: ट्रेनमध्ये सामान विसरल्यास परत कसं मिळवावं? करा फक्त 'हे' एक काम

How To Recover Luggage Lost in Train: ट्रेन प्रवासात अनेकदा लोक आपलं सामान विसरतात. हे सामान परत कसं मिळवायचं हे अनेकांना माहिती नसतं. जाणून घ्या हे सामान परत कसं मिळवायचं?  

Feb 06, 2024, 15:44 PM IST
1/8

Indian Railways: ट्रेन प्रवासात अनेकदा लोक आपलं सामान विसरतात. हे सामान परत कसं मिळवायचं हे अनेकांना माहिती नसतं. जाणून घ्या हे सामान परत कसं मिळवायचं?  

2/8

ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रवाशांना अनेक सुविधा मिळतात. या सुविधा प्रवास सुरु झाल्यापासून ते शेवटच्या स्थानकापर्यंत असतात.   

3/8

अनेकदा लोक रेल्वे स्थानकावर किंवा ट्रेनमध्ये आपलं सामान विसरतात. यानंतर नेमकं काय करावं हे अनेक प्रवाशांना समजत नाही.  

4/8

अनेकदा तर प्रवासी लॅपटॉप किंवा मौल्यवान वस्तूही प्रवासात विसरतात. यामुळे मोठं आर्थिक नुकसान होतं.   

5/8

पण जर तुमचं सामान ट्रेनमध्ये राहिलं तर घाबरण्याची गरज नाही. कारण फक्त एका पद्धतीने तुम्ही हे सामान परत मिळवू शकता.   

6/8

पश्चिम रेल्वेच्या सेवेच्या ऑपरेशन अमानत अंतर्गत तुम्ही तुमचे सामान मिळवू शकता. यामध्ये आरपीएफचे कर्मचारी तुमचं सामान शोधून वेबसाइटवर अपलोड करतात.  

7/8

यानंतर तुम्हाला www.wr.indianrailways.gov.in वर जाऊन सामानाची यादी पाहावी लागेल. तिथे तुम्हाला हरवलेल्या सामानाचा फोटो दिसेल.  

8/8

सामान तुमचंच आहे याचा पुरावा दिल्यानंतर तुम्ही रेल्वेकडून हरवलेलं हे सामान परत मिळवू शकता. त्यामुळे पुढच्या वेळी सामान हरवलं तर तात्काळ या वेबसाईटवरुन जाऊन चेक करा.