25000 पगार असलेले लोक होऊ शकतात कोट्याधीश! फॉलो करा गुंतवणुकीच्या 'या' टिप्स

प्रत्येक व्यक्ती ही दर महिन्याला येणाऱ्या पगाराची प्रतिक्षा करत असते. अशात काही लोक आहेत जे पगाराची नाही तर ते श्रीमंत कधी होणार याची प्रतिक्षा करत असतात. तर काही लोक विचार करतात की जास्त कमावतील तर लवकर श्रीमंत होतील. पण असं नाही तर ते कसं करता येईल ते आपण जाणून घेऊया.

| Jun 08, 2024, 16:11 PM IST
1/7

गुंतवणूक करण्याची योग्य पद्धत

जर तुम्ही योग्य पद्धतीत गुंतवणूक केली तर 20 हजार आणि 25 हजार पगार असणारे लोकं देखील कोट्याधीश होऊ शकतात. खरंतर हे इतकं सोपं देखील नाही. पण गुंतवणूक ही जास्त काळासाठी केली तरच हे शक्य आहे. 

2/7

SIP मध्ये करा गुंतवणूक!

जर तुम्ही छोटी गुंतवणूक करत असाल आणि ती जास्त कालावधीसाठी असेल तर तुमचं कोट्यांवधी होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. या पद्धतीनं तुमचा पगार कमी असला तरी तुम्ही श्रीमंत होऊ शकता. असाच एक फंडचा प्रकार आहे एसआयपी (SIP) म्हणजेच Systematic Investment Plan. एसयापीची छोटी गुंतवणूक करत मोठी रक्कम परत मिळवू शकतात. 

3/7

25000 पगार असल्यास किती गुंतवणूक कराल?

एसआयपीच्या कंपाउंटिंगचा फायदा तुम्हाला होतो आणि कमी गुंतवणूकीत तुमची मोठी रक्कम जमा होते. जर तुमचा पगार हा 25000 रुपये आहे तर गुंतवणूक करताना किती करणार यावर जास्त लक्ष द्यायला हवं. तुम्ही तुमच्या पगारातील 15-20 टक्के गुंतवणूक करायला हवी. याचा अर्थ 25000 पगार असेलतर तुम्ही 4000 ते 5000 रुपयांची गुंतवणूक करु शकतात. 

4/7

कसा होऊ शकतो फायदा?

म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा तुम्हाला कंपाऊंडिग फायदा होऊ शकतो. आता हे समजून घेणं गरजेचं आहे की मार्केटशी लिंक्ड असल्यानं त्यात धोका देखील तितकाच आहे आणि त्यामुळे असं होऊ शकतं की तुम्हाला रिटर्न मिळणार नाही. पण गेल्या काही वर्षात एसआयपीचे रिटर्न हे कमीत कमी 12 टक्के राहिलं आहे. 

5/7

किती वर्षात मिळतील कोटी रुपये?

जर तुम्ही 4000 रुपयांची एसआयपी करणार आहात, तर 12 टक्क्यांच्या हिशोबानं 28 वर्ष (339 महिने) गुंतवणूक केली तर तुम्हाला 1 कोटी मिळतील. जर तुम्ही दर महिन्याला 5000 रुपयांची एसआयपी केली तर तुम्हाला 26 वर्षात 1 कोटी रुपये मिळतील. जर तुम्ही पगारातील 30 टक्के भागाची गुंतवणूक केली तर 12 टक्केनं 23 वर्षात 1 कोटी रुपये मिळतील. पगाराचा 40 टक्के म्हणजे 10000 रुपयांची गुंतवणूक केली तर 20 वर्षात 1 कोटी तुम्हाला मिळतील.   

6/7

दरवर्षी 5 टक्क्यांनी वाढवा गुंतवणूक

जर तुम्हाला 1 कोटी ही रक्कम कमी वेळात मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्ही पहिल्यावर्षी दरमहिन्याला 4000 रुपयांची एसआयपीमध्ये गुंतवणूक करा आणि त्यानंतर दुसऱ्यावर्षी 4200 रुपयांची. दरवर्षी तुम्ही ही रक्कम 5 टक्क्यांनी वाढवत जा. कोणतीही गोष्ट करताना फायनॅनशिअल एक्सपर्टचा सल्ला घ्या. 

7/7

 (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)