तुम्ही सतत नखे चावताय का? मग 'या' उपायांनी सोडवा ही वाईट सवय

Nail Biting : नखे चावणे ही एक सवय आहे जी अनेकदा मुलांमध्ये दिसून येते. काही लोकांमध्ये नखे चावण्याची सवय दीर्घकाळ टिकून राहते. नखे चावल्याने किंवा खाल्ल्याने नखांना इजा होतेच, तर आरोग्यालाही हानी पोहोचते. तसेच नखे चावल्याने नखा भोवतीच्या त्वचेला सूज येते आणि त्यात संसर्ग होण्याचा धोका असतो. 

May 26, 2023, 18:36 PM IST
1/5

नखांवर नेलपॉलिश लावा. यामुळे तुमची सवय सुटेल. नखांचा लूक पाहून तुम्ही ती तोंडात घालणार नाही. दुसरे म्हणजे, नेलपॉलिशची चव कडू असते, त्यामुळे नखे चावणे टाळाल. जर तुम्ही पुरुष असाल तर तुम्ही पारदर्शक नेलपॉलिश वापरू शकता.

2/5

नखे लहान ठेवा आणि त्यांना नियमितपणे ट्रिम करा. नखे लहान ठेवल्याने तुम्ही ते चावण्यापासून रोखले जाऊ शकता. कारण लहान नखे अजून चावल्यास दुखापत होण्याचा धोका वाढतो. 

3/5

नखे विस्तारण्यासाठी विविध साहित्य वापरले जातात. ते खूप कठीण आणि महाग आहेत. म्हणूनच या दोन्ही गोष्टींचा विचार करून तुम्ही नखे चावणे बंद करु शकता. या लांब नखांवर नेल आर्टही करू शकता.तसेच लांब नखांवर केलेली कलाकुसर बिघडवायला कोणाला आवडेल, त्यामुळेही तुम्ही नखे खाणार नाही.

4/5

काही लोकांना एकाच बोटाची नखे चावण्याची सवय असते. अशावेळी त्या बोटावर बँड-एड लावावे.जेव्हा नखे ​​चवणी खायची तीव्र इच्छा होते, तेव्हा तोंडात बबलगम टाका व ते चावत रहावे.

5/5

 मॅनिक्युअर केल्याने नखे स्वच्छ आणि ट्रिम राहतात. त्यामुळे हातांनाही स्वच्छ लुक येतो. तुमच्या आजूबाजूच्या लोकांची मदत घ्या आणि तुम्ही तुमचे नखे चावायला लागला तेव्हा त्यांना थांबवायला सांगा.