घटस्फोटाचा हट्ट जीवावर बेतला, 15 वेळा हातोड्याचे वार करून निर्घृण हत्या
संतापाच्या भरात नवऱ्यानं एकदोन नाही 15 वेळा हातोड्यानं वार केले
1/5
नवरा बायकोमधला वाद टोकाला गेला आणि नवऱ्यानं आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावर जीवघेणा हल्ला केला. नवऱ्यानं जवळपास 15 वार हातोड्यानं या पत्नीच्या चेहऱ्यावर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीची निर्दयपणे हत्या करणारा साजिद परवेझ युनायटेड किंगडमच्या लीड्स येथे राहतो. साजिद मूळचा पाकिस्तानचा आहे. येथे तो पत्नी आणि मुलांसोबत राहत होता. साजिद आणि त्याची पत्नी अबिदा करीम यांच्या खूप मोठा वाद झाला. राग अनावर झाल्यानं साजिदनं चाकूने पत्नीवर वार करत तिची निर्घृण हत्या केली आहे. (अबिदा करीम - फाईल फोटो / क्रेडिट - वेस्ट यॉर्कशायर पोलीस)
2/5
अबिदा अनेकदा घरगुती हिंसाचाराचा बळी ठरली होती. साजिद तिचा खूप पूर्वीपासून अत्यंत वाईट पद्धतीनं छळ करत होता अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. साजिदने अनेकदा अबिदाला मारहाण केली. साजिदला मादक पदार्थांचे व्यसन होते. 21 वर्षांपूर्वी साजिद आणि अबिदाचे अरेंज मॅरेज झालं होतं. (साजिद परवेझ - फाइल फोटो / क्रेडिट - वेस्ट यॉर्कशायर पोलीस)
3/5
4/5
5/5