'जय श्री राम' म्हणत ब्रिटीश पंतप्रधनांनी सुरु केलं भाषण; म्हणाले, 'मी हिंदू म्हणून...'

UK PM Rishi Sunak Says Jai Shree Ram: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे असून ते हिंदू आहेत. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळेसही सुनक यांचं हिंदू असणं हे चर्चेत आलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांनी थेट केम्ब्रिज विद्यापीठामध्ये एका कार्यक्रमाला लावलेल्या हजेरीमुळे आणि त्यांनी केलेल्या भाषणामुळे त्यांचं हिंदू असणं चर्चेत आलं आहे. ऋषी सुनक नेमकं काय म्हणाले पाहूयात...

| Aug 16, 2023, 12:31 PM IST
1/9

UK PM Rishi Sunak Says Jai Shree Ram At Morari Bapu Ram Katha

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मंगळवारी अध्यात्मिक गुरु मोरारी बापू यांच्या रामकथेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. मोरारी बापू यांच्या रामकथेचा कार्यक्रम केम्ब्रिज विद्यापीठामध्ये पार पडला.   

2/9

UK PM Rishi Sunak Says Jai Shree Ram At Morari Bapu Ram Katha

यावेळेस ऋषी सुनक यांनी 'जय श्री राम' अशी घोषणा देत पुष्पांजली सुद्धा अर्पण केली. 

3/9

UK PM Rishi Sunak Says Jai Shree Ram At Morari Bapu Ram Katha

मोरारी बापू यांची रामकथा ऐकण्यासाठी आलेल्या ऋषी सुनक यांनी आपल्या भाषणामध्ये, भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मोरारी बापूंच्या रामकथेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळल्याने मला सन्मानित वाटत असून फार आनंद होत आहे असं म्हटलं.

4/9

UK PM Rishi Sunak Says Jai Shree Ram At Morari Bapu Ram Katha

तसेच ऋषी सुनक यांनी, "मी इथे पंतप्रधान म्हणून नाही तर हिंदू म्हणून सहभागी होण्यासाठी आलो आहे," असं म्हटलं. सुनक यांनी मोरारी बापू यांना शाल घातली. मोरारी बापू यांनीही सुनक यांना शाल घातली आणि एक शिवलिंग भेट म्हणून दिलं.

5/9

UK PM Rishi Sunak Says Jai Shree Ram At Morari Bapu Ram Katha

"माझ्यासाठी धार्मिक आस्था फार खासगी बाब आहे. आस्था मला आयुष्यातील प्रत्येक गोष्टीमध्ये मार्गदर्शन करते. पंतप्रधान होणं हा फार मोठा सन्मान आहे. मात्र हे काम फार सोपं नाही. आम्हाला कठीण निर्णय घ्यावे लागतात. आपल्या सर्वांचा विश्वास मला आपल्या देशासाठी सर्वोत्तम काम करण्यासाठी धैर्य आणि शक्ती देतो," असंही ऋषी सुनक यांनी म्हटलं.

6/9

UK PM Rishi Sunak Says Jai Shree Ram At Morari Bapu Ram Katha

"मी जेव्हा चान्सलर होतो तेव्हा 11 डाउनिंग स्ट्रीटवर दिवाळीनिमित्त दिवे लावताना फार अद्भुत आणि विशेष वाटायचं. मला अभिमान आहे की 10 डाऊन स्ट्रीटवरील माझ्या टेबलवर गणरायाची सोनेरी मूर्ती आहे," असंही ऋषी सुनक म्हणाले.

7/9

UK PM Rishi Sunak Says Jai Shree Ram At Morari Bapu Ram Katha

सुनक यांनी आपल्याला ब्रिटीश आणि हिंदू असल्याचा अभिमान आहे असंही सांगितलं. त्यांनी साऊथ हॅम्पटणमधील बालपणाबद्दलही सांगितलं. शेजारीच असलेल्या मंदिरामध्ये आपण भाऊ-बहिणींबरोबर अनेकदा जायचो. मी तिथे माझ्या कुटुंबाबरोबर हवन, पूजा, आरतीसाठी जायचो. अनेकदा प्रसादही वाटायचो, असंही सुनक म्हणाले.

8/9

UK PM Rishi Sunak Says Jai Shree Ram At Morari Bapu Ram Katha

आज मी इथून रामायण (रामकथा), भगवदगीता आणि हनुमान चालीसा ऐकून जात आहे. माझ्यासाठी भगवान राम हे आयुष्यातील आव्हानांचा सामना करताना प्रेरणास्त्रोत आहेत आणि कायमच राहतील.

9/9

UK PM Rishi Sunak Says Jai Shree Ram At Morari Bapu Ram Katha

मोरारी बापूंच्या आशिर्वादाने मी अशाच प्रकारे देशाचं नेतृत्व करेल जसं आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलं आहे, असा विश्वासही सुनक यांनी व्यक्त केला.