EVM वरुनही मविआमध्ये फूट; अजित पवार म्हणतात, "मला मशिनवर विश्वास आहे"

Ajit Pawar : बांगलादेश निवडणूक आयोगाने (BEC) जानेवारी 2024 मध्ये होणाऱ्या आगामी 12व्या संसदीय निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM) वापरली जाणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर भारतातही याच पडसाद उमटत आहेत. विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएम हटावचा नारा दिला जात आहे.  

Apr 08, 2023, 18:28 PM IST
1/8

MP Sanjay Raut on EVM

यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यशाचं गुपित ईव्हीएममध्ये दडलंय, असा दावाही त्यांनी केला आहे.

2/8

EVM Machin

सर्व विरोधी पक्षांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. जनेतेच्या मनातही ईव्हीएमबाबत शंका आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

3/8

bjp evm

ईव्हीएम हॅक करून भाजप लोकसभा निवडणुका जिंकते. भाजपच्या लोकप्रियतेचे आणि विजयाचे रहस्य त्या ईव्हीएममध्ये आहे, अशी टीका संजय राऊत यांनी सामना अग्रलेखात केली आहे.

4/8

sanjay raut saamana editorial

आपल्या देशात ईव्हीएम बंद करा सांगणारे एकजात देशद्रोही किंवा मोदीविरोधक ठरवले जातात. पण याच ईव्हीएममध्ये गडबड आहे व घोटाळा होऊ शकतो, असा शिमगा करणारे हेच भाजपवाले आहेत, असा आरोपही सामना अग्रलेखात करण्यात आला आहे.

5/8

Ajit Pawar leader of the opposition

दुसरीकडे कायमच सर्वांना धक्का देणारे राज्याचे विरोधी पक्षनेते आणि महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते अजित पवार यांनी मात्र ईव्हीएमवर विश्वास असल्याचे म्हटलं आहे.  

6/8

ajit pawar pune

पुण्यात माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी माझा ईव्हीएम मशीनवर विश्वास आहे, असे म्हटले आहे.

7/8

ajit pawar on evm

जर ईव्हीएम मशीनमध्ये घोळ करता आला असता तर देशातील अनेक राज्यात विरोधी पक्ष सत्तेत आलेच नसते. एवढा मोठया देशात एखादी गडबड कुणी करु शकत नाही, असे अजित पवार म्हणाले.

8/8

evm voting ajit pawar

आपला पराभव काही लोक ईव्हीएम मशीनवर ढकलून देतात, असा दावाही अजित पवार यांनी केला आहे.