भटक्या कुत्र्यांना पाहून भीती वाटते का? हे 5 मार्ग अवलंबल्याने ते होतील मित्र

How To Make Friends With Dogs :  भटके कुत्रे पाहिले की अंगावर काटा राहतो. ते आपल्याला चावा घेणार नाही ना. अंगावर धाऊन आले तर करायचे काय, अशी शंका मनात येत असेल तर या काही युक्तीच्या गोष्टी अमलात आणा. ज्याने तुमची भीती पळून जाईल आणि ते तुमचे मित्र होतील.  

Apr 08, 2023, 16:06 PM IST

How To Make Friends With Dogs : तुम्ही रस्त्यांनी चालत जात असताना किंवा बाईकने जात असताना अंगावर भुंकत कुत्रे येतात. तसेच ते तुमच्या पाठिमागे धावतात. त्यामुळे भटके कुत्रे पाहिले की भीतीच वाटते. आम्ही काही युक्तीच्या गोष्टी सांगणार आहोत, ज्याने तुमची भीती पळून जाईल आणि ते तुमचे मित्र होतील.  

1/5

घर-ऑफिसजवळच्या कुत्र्यांमुळे रस्त्यावर जाण्याची भीती वाटत असेल, तर रोज खाण्या-पिण्यासाठी काहीतरी घेऊन जावे आणि त्यांना द्यावे. यामुळे तो तुमचा मित्र बनेल आणि तुमच्यावर पुन्हा कधीही हल्ला करणार नाही.

2/5

तुम्ही कधीही तुमच्या स्कूटी किंवा बाईकवरून जात असाल तर तुम्ही वाहन जास्त वेगाने चालवू नये. अन्यथा भीतीपोटी कुत्रा तुमच्यावर हल्ला करू शकतो. तुम्ही फोनवर बोला. तो तुम्हाला काहीही करणार नाही.

3/5

श्वानाच्या डोळ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न काल. त्याला तुमच्याशी मैत्री करायची आहे का ते पहा. बर्‍याच अभ्यासातून असे दिसून आले आहे की जर कुत्रा तुमच्या डोळ्यांशी डोळा मिळवत असेल तर हे लक्षण आहे की कुत्रा तुमच्या जवळ येऊ इच्छितो आणि त्याला तुमच्याकडून प्रेम हवे आहे. कुत्र्यांना मारण्याऐवजी तुम्ही चांगले वागलात तर कदाचित ते तुमच्यात मिसळतील.

4/5

जर तुम्ही कुत्र्याला दरडावले किंवा त्यांना मारण्याचा प्रयत्न केला तर ते कधीही मैत्री करू शकणार नाहीत. यामुळे ते घाबरतील आणि हल्ला करण्याचा प्रयत्न करतील. त्याऐवजी, त्यांना मिठी मारून योग्य वागणूक द्या. प्राण्यांशी गैरवर्तन करण्याऐवजी, त्यांना प्रेमाने बोलावा, शक्यतो ते तुमचे मित्र बनतील.

5/5

ज्यावेळी तुम्ही रस्त्याने जात असाल तर घाबरुन जाऊ नका. कुत्रे पाहिले तर लगेच पाठ फिरवू नका. कुत्र्यांमध्ये वास घेण्याची शक्ती असते. त्याला प्रथम तुमच्याबद्दल जाणून येऊ द्या, तो वास घेईल आणि समजेल की तुम्ही त्याला इजा करणार नाही. जेणेकरुन पुढच्या वेळी तुम्ही त्याच्या जवळ याल तेव्हा तो तुम्हाला सहज ओळखू शकेल. त्याच्या हावभावावरुन कळेल की आता तो तुम्हाला इजा करणार नाही, मग तुम्ही त्याच्या डोक्यावर हात फिरवून त्याला तुमचा मित्र बनवा.