IAS Tina Dabi पोहोचली 'गोव्याच्या किनाऱ्यावर..'

 टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांच्या हनिमूनचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

Jul 06, 2022, 22:39 PM IST

IAS Tina Dabi and IAS Pradeep Gawande Romantic Photos : आयएएस अधिकारी टीना डाबी (Tina Dabi) आणि प्रदीप गावंडे (Pradeep Gawande) हे कपल गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहे. या दोघांचे फोटो टीनाने स्वतःच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांचे २२ एप्रिलला लग्न झालं आणि लग्नानंतर हे कपल पहिल्यांदाच गोव्याच्या ट्रिपवर गेलं आहे.

1/5

टीनाने स्वतः तिच्या हनिमूनचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती आपल्या पतीसोबत समुद्राच्या लाटांचा आनंद लुटताना दिसत आहे.

2/5

गोवा ट्रिपचे फोटो शेअर करत टीनाने लिहिलंय की, 'becoming one with the waves.' याफोटोमध्ये टीना आणि प्रदीप गावंडे (Pradeep Gawande) समुद्रकिनाऱ्यावर आणि गोव्यातील आलिशान हॉटेलमध्ये मजा करताना दिसत आहेत.

3/5

टीना डाबी आणि तिचा पती प्रदीप गावंडे (Pradeep Gawande) यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फोटो पाहून लोक या कपलची जोरदार प्रशंसा करत आहेत आणि त्यांना बेस्ट कपल म्हणत आहेत.

4/5

टीना डाबी (Tina Dabi) आणि प्रदीप गावंडे (Pradeep Gawande) यांचं लग्न 20 जूनला जयपूरमध्ये अत्यंत साधेपणात आणि काही कुटुंबीयांच्या उपस्थितीत झालं. यानंतर जयपूरमध्ये रिसेप्शनचे आयोजन करण्यात आलं होत.

5/5

टीना डाबीने याआधी IAS अधिकारी आणि जम्मू-काश्मीरचे रहिवासी असलेल्या अतहर अमीर खानशी (Athar Amir Khan) लग्न केलं होत, पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकल नाही आणि दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर टीनाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि आयएएस प्रदीप गावंडे यांच्याशी दुसरं लग्न केलं. त्याचबरोबर आता आमिरही दुसरं लग्न करणार असून नुकतंच त्याने डॉक्टर मेहरीन काझी यांच्याशी लग्न केलं आहे.