ICAR: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 'या' 3 निर्णयांमुळे पिकांच्या उत्पादनात होणार भरघोस वाढ

पशुधन, मत्स्यपालन आणि फलोत्पादनातील संशोधनावर अधिक भर देण्यात येणार असल्याची माहिती  आयसीएआरचे महासंचालक हिमांशू पाठक यांनी दिली. हवामान बदलामुळे पीक उत्पादनावर परिणाम होणार नाही याची खात्री करण्यासाठी आयसीएआर हवामानास अनुकूल बियाणे वाण विकसित करणे सुरू ठेवणार आहे. 

| Jul 19, 2023, 11:14 AM IST

Agriculture Sector: पशुधन, मत्स्यपालन आणि फलोत्पादनातील संशोधनावर अधिक भर देण्यात येणार असल्याची माहिती  आयसीएआरचे महासंचालक हिमांशू पाठक यांनी दिली. हवामान बदलामुळे पीक उत्पादनावर परिणाम होणार नाही याची खात्री करण्यासाठी आयसीएआर हवामानास अनुकूल बियाणे वाण विकसित करणे सुरू ठेवणार आहे. 

1/9

ICAR:शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 'या' 3 निर्णयांमुळे पिकांच्या उत्पादनात होणार भरघोस वाढ

ICAR focus Agriculture Sector Artificial Intelligence Livestock and Fisheries for farmers

Farmers in India: शेतकरी हा अन्नदाता आहे. त्यामुळे शेतकरी सुखी असेल तर देश सुखी असे म्हटले जाते. त्यामुळे सरकारदेखील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या विविध योजना आणत असते. शेतीतून मिळणारे उत्पादन वाढविणे हे शेतकऱ्यांसमोरचे मोठे आव्हान आहे.यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजेच आयसीएआरने काही महत्वाची पाऊले उचलली आहेत. 

2/9

हवामान बदलाचा परिणाम

ICAR focus Agriculture Sector Artificial Intelligence Livestock and Fisheries for farmers

पशुधन, मत्स्यपालन आणि फलोत्पादनातील संशोधनावर अधिक भर देण्यात येणार असल्याची माहिती  आयसीएआरचे महासंचालक हिमांशू पाठक यांनी दिली. हवामान बदलामुळे पीक उत्पादनावर परिणाम होणार नाही याची खात्री करण्यासाठी आयसीएआर हवामानास अनुकूल बियाणे वाण विकसित करणे सुरू ठेवणार आहे. 

3/9

कंपन्यांकडून संयुक्त संशोधन

ICAR focus Agriculture Sector Artificial Intelligence Livestock and Fisheries for farmers

कृषी आणि फळबाग पिकांच्या लागवडीमध्ये डिजिटल साधनांचा वापर करण्याबरोबरच काढणीपश्चात व्यवस्थापनावरही भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच संशोधन संस्था खासगी कंपन्यांना संयुक्त संशोधन करण्यासाठी आमंत्रित करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

4/9

कृषी क्षेत्र

ICAR focus Agriculture Sector Artificial Intelligence Livestock and Fisheries for farmers

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी आयसीएआरच्या कृषी शास्त्रज्ञांना पशुसंवर्धन आणि मत्स्यपालनाच्या संशोधनावर अधिक भर देण्यास सांगितले. यामुळे उत्पादन आणि एकूण कृषी क्षेत्राच्या विकासात त्यांचे योगदान वाढणार आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) 95 व्या स्थापना दिनानिमित्त मंत्र्यांनी डिजिटल पद्धतीने साधलेल्या संवादात ही माहिती दिली.   

5/9

पशुधन आणि मत्स्यपालन

ICAR focus Agriculture Sector Artificial Intelligence Livestock and Fisheries for farmers

आमचे संशोधन कार्य केवळ पिकांपुरते मर्यादित नाही. पशुधन आणि मत्स्यपालन हे नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. प्राणी विज्ञानावर लक्ष केंद्रित करणाऱ्या देशभरात 15 संस्था आहेत आणि मत्स्यपालनासाठी 8 संशोधन संस्था असल्याचे पाठक म्हणाले. अलिकडच्या वर्षांत पशुधन, मत्स्यपालन आणि फलोत्पादन क्षेत्रांची वाढ जास्त झाली आहे. आम्ही या क्षेत्रांवर अधिक लक्ष केंद्रित करणार आहोत. यामुळे आम्ही उच्च विकास दर मिळवू शकू आणि शेतकर्‍यांनाही फायदा होईल, असे ते म्हणाले.

6/9

कृषी क्षेत्र

ICAR focus Agriculture Sector Artificial Intelligence Livestock and Fisheries for farmers

हवामान बदलाच्या आव्हानाविषयी पाठक यांनी माहिती दिली. मत्स्यव्यवसाय क्षेत्र सुमारे नऊ टक्के दराने वाढत आहे, तर पशुपालन आणि फलोत्पादन क्षेत्राची वाढ देखील पिकांच्या तुलनेत जास्त असल्याचे पाठक म्हणाले. ICAR ने 6,000 पेक्षा जास्त बियाणांच्या जाती विकसित केल्या आहेत, त्यापैकी सुमारे 1,900 हवामानाला अनुकूल आहेत. गव्हाच्या काही अशा जाती आहेत ज्या हिवाळ्यात (जानेवारी-फेब्रुवारी) तापमानात अचानक वाढ झाल्यास परिस्थितीला अनुकूल ठरतील.

7/9

ICAR तंत्रज्ञान विकसित

ICAR focus Agriculture Sector Artificial Intelligence Livestock and Fisheries for farmers

ICAR ने धान आणि इतर पिकांच्या अनेक जाती विकसित केल्या आहेत ज्या दुष्काळ आणि पूर या दोन्हीसाठी प्रभावी आहेत. तसेच त्यांनी खासगी कंपन्यांशी सहकार्य मजबूत करण्यावरही भर दिला आहे. 'आम्ही खासगी कंपन्यांशी सहकार्य करत आहोत. ICAR तंत्रज्ञान विकसित करते आणि त्यानंतर आम्ही खासगी कंपन्यांना तंत्रज्ञानाचे व्यावसायिकीकरण करण्यासाठी आमंत्रित करत असल्याचे पाठक म्हणाले.

8/9

कृषी क्षेत्रातील समस्या सोडवणार

ICAR focus Agriculture Sector Artificial Intelligence Livestock and Fisheries for farmers

आता कृषी आणि संलग्न क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी आयसीएआर आणि खासगी कंपन्यांनी सुरुवातीपासूनच सहकार्य करावे आणि संशोधन करावे अशी आमची इच्छा असल्याचे ते म्हणाले.

9/9

कृत्रिम बुद्धिमत्ता

ICAR focus Agriculture Sector Artificial Intelligence Livestock and Fisheries for farmers

परिषद अचूक शेती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेला देखील प्रोत्साहन देईल, असे ICAR महासंचालक म्हणाले.  ICAR संस्था, कृषी विद्यापीठे आणि कृषी विज्ञान केंद्रे (KVKs) यांनी ड्रोनचा वापर सुरू केला असल्याची माहितीही त्यांनी दिली.