एअर शो, ड्रोनची कलाकारी आणि करोडो चाहत्यांचा उत्साह, देशभरात ' दिल जश्न बोले'... पाहा फोटो

ICC World Cup 2023 Final: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडिअमवर विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जातोय. अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडिअमवर प्रेक्षकांनी खचाखच भरलं आहे.  सामन्यापूर्वी एअरशो पाहिला मिळाला. तर संपूर्ण स्टेडिअम निळ्या रंगात रंगलं आहे.

| Nov 19, 2023, 15:01 PM IST
1/7

गुजरातच्या अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान अंतिम सामना खेळवला जात आहे. लाखो क्रिकेट चाहत्यांनी मोदी स्टेडिअम खचाखच भरलं आहे. भारताची निळी जर्सी परिधान करुन लाखो चाहते मैदानात हजर आहेत. देशभरात भारताची जर्सी घालून टीम इंडियाचा उत्साह वाढवला जातोय.

2/7

टीम इंडियाबरोबरच ऑस्ट्रेलियाचे चाहतेही मोठ्या संख्येने स्टेडिअममध्य उपस्थित आहेत. आपल्या संघाला चिअर करण्यासाठी ऑस्ट्रेलियन चाहते देशाचा प्लॅग घेऊन मैदानात हजर आहेत.

3/7

अंतिम सामना सुरु होण्याआधी अहमदाबादच्या मोदी स्टेडिअमवर आकाशात एअर शोचा शानदार नजारा पाहिला मिळाला.

4/7

अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला मोदी स्टेडिअमवर आकाशात ड्रोनची नजरेचं पारणं फेडणारी कलाकारी पाहिला मिळाली. ड्रोनच्या मदतीने आकाशात भारताचा नकाशा बनवण्यात आला. त्यानंतर विश्वचषकाची प्रतिकृतीही बनवण्यात आली. 

5/7

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरने ड्रोन शोचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या सोबत तीने एक कॅप्शन लिहिला असून यात तीने विश्वचषक 2023 अंतिम सामन्याआधी मोदी स्टेडिअमवर ड्रोन शो' असं लिहिलं आहे. 

6/7

देशभरातून टीम इंडियाला चिअर करण्यासाठी क्रिकेट चाहते रस्त्यावर उतरले आहेत. भारताच्या विजयासाठी कुठे होमहवन तर कुठे मंदिर-मस्जिदमध्ये प्रार्थना केल्या जात आहेत.

7/7

विश्वचषकावर तिसऱ्यांदा नाव कोरण्यापासून टीम इंडिया आता फक्त एक पाऊल दूर आहे. टीम इंडिया हे स्वप्न पूर्ण करेल अशी अपेक्षा करोडो भारतीय चाहते बाळगून आहेत.