'मी या जगात नसले तर...', लोकप्रिय अभिनेत्री पोस्ट शेअर करत असं का म्हणाली?
अलीकडेच एक प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट केली. ज्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला. अभिनेत्रीची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्यामुळे चाहते त्या पोस्टखाली कमेंटमध्ये तिच्या तब्बेतीबद्दल विचारपूस करत आहेत. जाणून घेऊया पोस्टमध्ये तिने काय लिहिले...
आत्तापर्यंत फलक 'महाकाली', 'रूप', 'तारक मेहता का उल्टा चष्मा', 'राम सिया के लव कुश', 'पंड्या स्टोर' आणि 'बिग बॉस ओटीटी 2' या रिॲलिटी शोमध्ये बघायला मिळाली आहे.
1/6
2/6
3/6
ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून फलक नाझ आहे. तिने काही तासांपूर्वी तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. जी काही वेळातच व्हायरल झाली होती. पोस्टमध्ये अभिनेत्रीने मृत्यूबद्दल लिहिले आहे. तिने लिहिले की,'उद्या मी इथे नसली तर? तुम्हाला माझी आठवण येईल का? आपण जेव्हा एकत्र होतो ते क्षण तुम्ही सोशल मीडियावर शेअर करत माझी आठवण काढाल, पण दुर्दैवानं ते मला पाहता येणार नाही.
4/6
या पोस्टमध्ये अभिनेत्रीने असे विचारले आहे की, मृत्यूनंतर लोक श्रद्धांजली कशी वाहतात? याविषयी बोलताना पुढे फलक नाझ म्हणाली 'कारण तोपर्यंत मी या जगाचा निरोप घेतलेला असेल. एकदा का मी निरोप घेतला की मग त्यानंतर तुमची पोस्ट किंवा स्टोरी यानं मला काही आनंद किंवा फरक पडणार नाही. या आयुष्याचा काही भरोसा नाही. त्यामुळेच ज्याच्यावर आपण प्रेम करतो, ते जोपर्यंत आपल्यासोबत आहेत, त्यांना तुम्हाला काय वाटतं त्यांच्यासाठी तुमच्या मनात काय भावना आहेत हे त्यांना सांगा आणि दाखवा. सकारात्मकता आणि प्रेम या सगळ्यांपर्यंत पोहोचवा.
5/6
6/6