जग्गनाथ मंदिरातील रत्नभांडारात खरंच सर्प आणि गुप्त तळघर आढळले? खरं जाणून घ्या

ओडिशातील जग्गनाथ पुरी मंदिरातील रत्नभांडार खुले करण्यात आले आहे. तब्बल 46 वर्षांनंतर 14 जुलै रोजी ही रत्नभांडार उघडण्यात आले. यावेळी खरंच या रत्नभांडारात साप आणि तळघर आहे का? या प्रश्नांची उत्तरे समोर आली आहेत. 

| Jul 19, 2024, 14:09 PM IST

ओडिशातील जग्गनाथ पुरी मंदिरातील रत्नभांडार खुले करण्यात आले आहे. तब्बल 46 वर्षांनंतर 14 जुलै रोजी ही रत्नभांडार उघडण्यात आले. यावेळी खरंच या रत्नभांडारात साप आणि तळघर आहे का? या प्रश्नांची उत्तरे समोर आली आहेत. 

1/7

Puri Jagannath Temples Ratna Bhandar details you need to know

 जग्गनाथ पुरी येथील रत्नभांडारात काय आहे? याची उत्सुकता अनेकांना होती. अखेर सरकारच्या आदेशानंतर रत्नभांडार खुले करण्यात आले आहेत. त्यानंतर आतमध्ये काय आहे, हे देखील समोर आले आहे. 

2/7

Puri Jagannath Temples Ratna Bhandar details you need to know

जग्गनाथच्या रत्नभांडार 4 कपाटं आणि 3 पेट्या सापडल्या आहेत. या पेट्यांमध्ये मौल्यवान धातु आणि रत्न सापडले आहेत. तसंच, आता या रत्नभांडाराचे काम करण्यात येणार आहे. त्या पूर्वी आतील सर्व मौल्यवान वस्तू दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. 

3/7

Puri Jagannath Temples Ratna Bhandar details you need to know

4  मोठे कपाट आणि 4 मोठ्या लाकडी बॉक्समध्ये दागिने  आहेत. हे दागिने भगवान जग्गनाथ यांचे असल्याचे बोलले जाते. 

4/7

Puri Jagannath Temples Ratna Bhandar details you need to know

रत्नभांडार येथील आभूषणांची सुरक्षा सर्प करतात, असा दावा होता. मात्र, रत्नभांडार खुला करण्यात आल्यानंतर तिथे कोणत्याही प्रकारचे साप आढळले नाहीत. 

5/7

Puri Jagannath Temples Ratna Bhandar details you need to know

तसंच, या रत्नभांडारमध्ये तळघर असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, जेव्हा समितीच्या सदस्यांनी आतील पडताळणी केली तेव्हा मात्र, कुठेही तळघर आढळून आले नाही. 

6/7

Puri Jagannath Temples Ratna Bhandar details you need to know

रत्नभांडारमध्ये सापडलेल्या मौल्यवान सोनं आणि रत्नांचे ऑडिट होणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

7/7

Puri Jagannath Temples Ratna Bhandar details you need to know

12 व्या दशकातील या मंदिराचा रत्नभंडार शेवटचा 1978 रोजी खुला करण्यात आला होता. त्यावेळी या खजिन्यात असलेले दागिने आणि रत्न याची मोजणी करण्यासाठी जवळपास 72 दिवस लागले होते.