IPL मध्ये मेडल्सची परंपरा असती तर कोणते संघ असते टॉपवर? पाहा यादी

If IPL gave medals like the olympics : ऑलिम्पिकमध्ये जसं गोल्ड, सिल्वर आणि ब्राँझ मेडल दिले जातात. तसंच जर आयपीएलमध्ये पहिल्या तीन संघांना मेडल्स दिले असते तर... कोणत्या संघाने मारली असती बाजी?

| Aug 10, 2024, 18:33 PM IST
1/5

चेन्नई सुपर किंग्ज

जर आयपीएलमध्ये मेडल्स देण्याची परंपरा असली असती तर चेन्नई सुपर किंग्जकडे आत्तापर्यंत सर्वाधिक मेडल्स असते. चेन्नईकडे 5 गोल्ड, पाच सिल्वर आणि एक ब्राँझ मेडल असं एकूण 11 मेडल्स असले असते. 

2/5

मुंबई इंडियन्स

तर मुंबई इंडियन्स या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पलटणकडे पाच गोल्ड, एक सिल्वर आणि दोन ब्राँझ मेडल्स असले असते. तर केकेआर देखील एकूण 6 मेडलसह तिसऱ्या स्थानी आहे. त्यांच्याकडे तीन गोल्ड, एक सिल्वर आणि दोन ब्राँझ मेडल असतं.

3/5

सनरायझर्स हैदराबाद

चौथ्या स्थानी सनरायझर्स हैदराबादचा नंबर लागतो. एसआरएचकडे एक गोल्ड, दोन सिल्वर आणि एक ब्राँझ मेडलसह एकूण 4 मेडल असले असते. तसेच राजस्थानकडे देखील एक गोल्ड, एक सिल्वर आणि दोन ब्राँझसह 4 मेडल असले असते.

4/5

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सकडे एक गोल्ड आणि एक सिल्वर आहे. तर डेक्कन चार्जर्स या यादीत 7 व्या स्थानी आहे. डेक्कन चार्जर्सकडे 1 गोल्ड असलं असतं. तसेच आरसीबीकडे एकही गोल्ड नसताना तीन सिल्वर आणि तीन ब्राँझच्या जोरावर एकूण 6 पदकं आहेत.

5/5

दिल्ली कॅपिटल्स

दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सकडे एक सिल्वर, चार ब्राँझ आहेत. तसेच पंजाब किंग्जकडे एक सिल्वर आणि एक ब्राँझ असेल. या व्यतिरिक्त रायझिंग पुणे सुपरजायएन्ट कडे एक सिल्वर आणि गुजरात लायन्सकडे एक ब्राँझ मेडल असलं असतं.