2025 मध्ये 'शोले' चित्रपट बनला असता तर 'इतके' असते बजेट, 1975 मध्ये 3 कोटी होते बजेट

1975 मध्ये 3 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला 'शोले' चित्रपट 2025 मध्ये बनला असता तर त्याचे बजेट काय असते? 

Soneshwar Patil | Jan 29, 2025, 17:36 PM IST
1/7

1975 मध्ये 'शोले' चित्रपट चित्रपटगृहांमध्ये  प्रदर्शित झाला होता. ज्याने अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या चित्रपट कारकिर्दीला चालना दिली.

2/7

'शोले' हा चित्रपट 1975 चा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला. रिपोर्टनुसार, निर्मात्यांनी हा चित्रपट बनवण्यासाठी अंदाजे 3 कोटी रुपये खर्च केले होते. 

3/7

या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर 35 कोटींची कमाई केली होती. जर निर्मात्यांनी 2025 मध्ये हा चित्रपट बनवला असता तर त्याचे बजेट किती असते? जाणून घेऊयात. 

4/7

India.com च्या रिपोर्टनुसार, 'शोले' चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा चित्रपट 2025 मध्ये बनवला असता तर त्यांना सुमारे 300 ते 400 कोटी रुपये खर्च आला असता.

5/7

1975 मध्ये या चित्रपटात कोणतेही VFX किंवा तंत्रज्ञान वापरले गेले नव्हते. त्यामुळे असे गृहीत धरले जाऊ शकते की आधुनिक तंत्रज्ञान VFX,CGI,ड्रोन शॉट्स, हाय-टेक कॅमेरे निर्मात्यांनी वापरल्यास सुमारे 65 ते 110 कोटी रुपये खर्च येतो.

6/7

ज्या ठिकाणी 'शोले'चे शूटिंग झाले होते त्याच ठिकाणी जर सेट 2025 मध्ये बांधला गेला असता, तर त्याचे बजेट सुमारे 15 ते 20 कोटी रुपये असते. 

7/7

तर चित्रपटातील कलाकारांच्या फीबद्दल बोलायचे झाले तर 1975 मध्ये प्रत्येकाची फी लाखात असती तर 2025 मध्ये ती कोटींवर पोहोचली असती. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x